Bjp Ex. spokesperson Nupur Sharma
Bjp Ex. spokesperson Nupur Sharma  Sarkarnama
मराठवाडा

Beed : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मावर बीडमध्ये गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो

बीड : भाजपच्या निलंबीत प्रवक्त्या नुपूर शर्मा विरुद्ध बुधवारी (ता. १५) बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. (Beed) नुपूर शर्मांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरुन धार्मिक भावना दुखावल्याचे अॅड. अजिज खाजापाशा सय्यद यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

नुपूर शर्मांनी एका दुरचित्रवाणी कार्यक्रमात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने समाजातून तिव्र प्रतिक्रीया उमटल्या होत्या. (Fir Filed) या विरुद्ध शहर आणि जिल्ह्यात आंदोलन होऊन नुपूर शर्मावर (Marathwada) कडक कारवाईची मागणीही करण्यात आली होती.

दरम्यान, बुधवारी समाजबांधवांची बैठक होऊन गुन्हा नोंद करण्याचा निर्णय झाला. यानंतर अॅड. अजिज खाजापाशा सय्यद यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नुपूर शर्मा यांनी धार्मिक भावना दुखावण्यासह समाजांमध्ये शत्रुत्वाची किंवा द्वेषाची भावना निर्माण होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड करत आहेत. नुपूर शर्मा यांच्या विरोधात नुकतेच देशभरात आंदोलन करण्यात आले होते. एमआएमसह विविध मुस्लिम संघटनांनी नुपूर शर्मावर कायदेशीर कारवाईची मागणी करत निदर्शने केली होती.

मराठवाड्यात जालना, औरंगाबाद आणि उत्तर प्रदेश, रांची, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये देखील शुक्रवारच्या नमाजानंतर मोठ्या प्रमाणात संतप्त मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला होता. या आंदोलनाला उत्तर प्रदेश, रांचीमध्ये हिंसक वळण देखील लागले होते. नुपूर शर्माच्या विधानावरून अजूनही देशातील वातावरण तापलेले आहे, देशातील विविध राज्यात नुपूर शर्मा विरोधात पोलिसांत गुन्हे देखील दाखल झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT