Bjp Leader Visit Farmers Farm News Beed
Bjp Leader Visit Farmers Farm News Beed Sarkarnama
मराठवाडा

Beed : पंकजा मुंडेंसमोरच शेतकरी म्हणाला, जीवाच बर वाईट केल्याशिवाय पर्याय नाही..

सरकारनामा ब्युरो

बीड : आमच्यावर आभाळच कोसळलयं..लई नुसकान झालयं..आता जीवाचं बरं वाईट केल्याशिवाय पर्याय नाही, या संकटातून आता तुम्हीच आम्हाला बाहेर काढा, असे धायमोकलून रडत शेतकऱ्याने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या समोर व्यथा मांडली. असं काही करू नका..धीर धरा..सरकार नक्की मदत करेल, मी तुमच्या पाठिशी आहे, असा धीर पंकजा मुंडे यांनी त्या शेतकऱ्याला दिला.

शेतकरी हताश आणि निराश आहे, अशा संकटात त्याला आधार दिला गेला पाहिजे. (Beed) नुकसान मोठे आहे, सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, महामार्गाच्या लगतच्या (Farm) शेतात निकृष्ट नाली बांधकामामुळे शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे, यात दोषी कंत्राटदारावर कारवाई व्हावी, अशी मागणीही पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली.

पीक विम्याच्या बाबतीत जिल्हयावर अन्याय होत आहे, पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावे. विमा कंपनीला सरकारच्या आदेशाचे पालन करावेच लागेल असेही त्या म्हणाल्या.जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून परतीचा जोराचा पाऊस पडत आहे. काढणीला आलेले सोयाबीन, कपाशी, मका, बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकरी हवालदिल आहे. जिल्ह्यात सर्वत्र अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी तालुक्यातील जाधववाडी येथे पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी भाजपनेते रमेश आडसकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह पदाधिकारी उपस्थीत होते.

पावसामुळे शेतात अक्षरशः पाण्याचे तळे साचले असून पिके पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे विदारक चित्र यावेळी होते. तहसिलदार सुहास हजारे त्यांना नुकसान व पंचनाम्याबाबत माहीती देत होते. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी भारत जाधव याला आश्रु अनावर झाले आणि त्याने धायमोकलून रडत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT