Beed PSI assault case Sarkarnama
मराठवाडा

Beed PSI assault case : पोलिस उपनिरीक्षक घरात घुसला, एकट्या विवाहितेबरोबर नाय-नाय ते केले? बीडमधील खळबळजनक घटना

Beed PSI booked after a married woman alleged sexual assault in Wadwani : वडवणीत 19 सप्टेंबरच्या मध्यरात्री घटना घडल्याचा तक्रारीत दावा; बीड पोलिस दलातील PSI गणेश राठोड तपासाच्या केंद्र

Pradeep Pendhare

Beed PSI booked after woman complaint : बीड जिल्ह्यातील वडवणी येथे एका पोलिस उपनिरीक्षकाविरोधात विवाहितेने गंभीर तक्रार दाखल केली आहे. घरात एकटी असताना पोलिस उपनिरीक्षकाने जबरदस्तीने घरात प्रवेश करून अत्याचार केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे.

या तक्रारीवरून पोलिस उपनिरीक्षक गणेश राठोड यांच्याविरोधात वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, 19 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर वडवणी येथे ही घटना घडली. विवाहिता घरात एकटी असताना आरोपी अचानक घरात आला. त्यानंतर त्याने जबरदस्ती केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेनंतर पीडितेने वडवणी पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमांनुसार गणेश राठोड यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून सहायक पोलिस निरीक्षक द्रोणाचार्य हे तपास करत आहेत.

दरम्यान, तक्रारीनंतर उपनिरीक्षक गणेश राठोड हे पोलिस ठाण्यात हजर झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिस दलात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांची तपासातून पडताळणी होणे बाकी आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीची सविस्तर चौकशी करून उपलब्ध पुरावे आणि तपासातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

बीड पोलिस दल पुन्हा चर्चेत.....

या घटनेमुळे बीड पोलिस दलात खळबळ उडाली आहे. उपनिरीक्षकाविरोधात थेट अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने, काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मध्यंतरी राज्यात चर्चेत होती. अजूनही चर्चेत आहेत. पोलिसांवर कायदा-सुव्यवस्थेचा ताण आहे. यातच रक्षकाविरोधात गंभीर गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा एकदा बीड पोलिस दल चर्चेत आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT