Sanipan Bhumre, News Marathwada Sarkarnama
मराठवाडा

Sandipan Bhumre News : आमदार राजपूतही आमच्या सोबत होते, ते ऐका खोक्यातच पळत सुटले असते..

Shivsena : सुरतला जाण्यापुर्वी माझ्या घरी उदयसिंह राजपूत आमच्या सोबत जेवत होते.

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यांच्या सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई प्रवासाच्या सुरस कथा अजूनही चर्चिल्या जातात. ५० खोके घेवून शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी गद्दारी केल्या आरोप ठाकरे गटाकडून केला जातो. कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत (Udaysingh Rajput) यांनी देखील आपल्याला ५० खोके देण्याचा प्रयत्न झाला होता. आपल्या पेट्रोल पंपावर पैशाच्या बॅग भरून गाडी आली होती, असा दावा केला होता.

कन्नड दौऱ्यावर असलेल्या पाकमंत्री संदीपान भुमरे यांना याबद्दल छेडले असता त्यांनी राजपूत यांच्या दाव्याचा समाचार घेतला. (Kannad) राजपूत आपल्याच कार्यकर्त्यांकडून १० टक्के वसुली करतात, त्यांना ५० खोक्यांची काय गरज? ते तर एका खोक्यातच आमच्याकडे पळत आले असते, अशी टीका भुमरे यांनी केली.

भुमरे म्हणाले, आमदार राजपूत मला ५० खोक्यांची आॅफर दिली होती असे सांगतात, मुळात जो आमदार आपल्या कार्यकर्त्यांकडून कामाचे १० टक्के वसुल करतो त्याला ५० खोके देण्याची काय गरज आहे. ते तर एका खोक्यातच आमच्याकडे पळत सुटले असते. आम्ही जेव्हा उठाव केला, तेव्हा सुरतला जाण्यापुर्वी माझ्या घरी उदयसिंह राजपूत आमच्या सोबत जेवत होते. मी बाहेर जावून येतो असे सांगून ते गेले आणि त्यांना अंबादास दानवे भेटले.

दानवेंनी त्यांना सोबत नेले, नाहीतर राजपूत आज आमच्यासोबत असते असा दावा देखील भुमरे यांनी केला. त्यामुळे आता पुन्हा एकदा खोक्यांची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत हे शिंदे बंडानंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. एकनिष्ठ आमदार म्हणून त्यांच्या मतदारसंघात सत्कार देखील करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT