Gangadhar Bordikar-Vijay Bhamble Parbhani

 

Sarkarnama

मराठवाडा

भांबळेचे खोटे आरोप सहन करणार नाही ; सापडलेला गहू अन् त्या शेताशी माझा संबंध नाही

ती शेती मुळात माझी नाहीच. त्या शेतीशी आपला संबंध नाही, केवळ राजकीय द्वेषापोटी माझ्यावर माजी आमदार विजय भांबळे यांनी आरोप केला आहे. (Gangadhar Bordikar)

सरकारनामा ब्युरो

परभणी ः मुडा (ता.जिंतूर) येथील शेतीतून पकडण्यात आलेल्या गहु प्रकरणात आपला कसलाही संबंध नाही. (NCP)ज्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली ती शेती आपली नाही, असा खुलासा गंगाधर बोर्डीकर (Parbhani) यांनी पत्रकार परिषदेत केला. (Marathwada)

काही दिवसांपुर्वी एका शेतात लाखो रुपयांचा बेवारस गहू सापडल्यानंतर पोलिसांनी तिथे कारवाई केली होती. ज्या शेतात पोलिसांनी ही कारवाई करत गहू जप्त केला ते शेत गंगाधर बोर्डीकरांचे असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांनी केला होता.

त्यानंतर बोर्डीकर यांनी यावर आज स्पष्टीकरण देत ते शेत आणि तिथे सापडलेला गहू याच्याशी आपला किंवा आपल्या कुटुंबाचा दुरान्वये संबंध नसल्याचे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलतांना बोर्डीकर म्हणाले, ज्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे ती शेती मुळात माझी नाहीच. त्या शेतीशी आपला संबंध नाही, केवळ राजकीय द्वेषापोटी माझ्यावर माजी आमदार विजय भांबळे यांनी आरोप केला आहे.

या संदर्भात आपण जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना पत्र दिले आहे. भांबळे यांच्या खोट्या तक्रारी आपण सहन करणार नाहीत, या प्रकरणी आपण खोटे आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील करणार आहोत. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून खर काय ते लोकांपर्यंत आणावे, असे आवाहन त्यांनी केले.

मुडा (ता.जिंतूर) येथील शिवारात पोलिस अधिक्षकांच्या पथकाने गहु जप्त केला आहे. या कारवाईवरून जिंतूर तालुक्यात राजकारण तापले आहे. हा गहु जिथे पकडला ते शेत गंगाधर बोर्डीकर यांच्या मालकीचे असल्याचा आरोप भांबळे यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT