Bharat Jodo In Maharashtra News, Nanded
Bharat Jodo In Maharashtra News, Nanded Sarkarnama
मराठवाडा

Bharat Jodo : इंदिरा गांधींचा नातू पाहिला गं बाई..

सरकारनामा ब्युरो

नांदेड/मारताळा : काॅंग्रेस नेते राहूल गांधी आणि त्यांच्या भारत जोडो यात्रेबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड आकर्षण दिसून आले आहे. महाराष्ट्रात यात्रा दाखल झाल्यानंतर आज चौथ्या दिवशी देखील यात्रेतील गर्दी आणि उत्साह तूसभरही कमी झालेली नाही, उलट ती वाढतच आहे. यात वृद्ध महिलांची संख्या लक्षणीय आहे.

आपल्या काळात इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना पाहिलेल्या या महिलांना इंदिराजींचा नातू आणि राजीव यांचा मुलगा पाहण्याची उत्सूकता जागोजागी दिसून येत होती. (Congress) ज्या महिलांना (Rahul Gandhi) राहुल गांधी यांच्यीशी संवाद साधण्याची संधी मिळाली त्यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. `इंदिरा गांधीचा नातू पाहिला गं बाई`, अशा उत्सफूर्त प्रतिक्रिया उमटतांना दिसल्या.

भारत जोडो यात्रा चौथ्या दिवशी गुरुवारी (ता.१०) सकाळी कापशी गुंफा येथून मारतळा, कांकाडी, जवाहरलाल नगर, तुप्पा,चंदासिंग कॉर्नर कडे निघाली. तेव्हा मारतळा येथे लगतच्या वाळकी, कौडगाव, नांदगाव , चिंचोली, कामळज, कापसी बुद्रुक गावातून ही यात्रा व राहुल गांधी यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा एकच गर्दी झाली होती.

त्यात महिला एकमेकांशी बोलताना `हेच का इंदिरा गांधींचे नातू म्हणत पाहिला गं बाई म्हणत कुजबुजत होत्या. मारतळा येथे रस्त्याच्या दुतर्फा अबाल, वृद्ध महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. कौठा फाटा येथे बुधवारी रात्री मुक्कामानंतर कापशी गुंफा येथून गुरुवारी मारतळा येथून पुढे यात्रा मार्गस्थ झाली. मारतळा येथे गॅलरी, घराच्या छतावर व रस्त्याच्या दुतर्फा गावातील महिला , शेतकरी ,कष्टकरी, आबाल वृद्धांनी इंदिरा गांधी यांचा नातू पाहायचा म्हणून मोठी गर्दी केली होती.

यात्रा गेल्यानंतर घराकडे परततांना पाहिला बाई इंदिराजी गांधी यांचा नातू म्हणत त्या समाधानाने घराकडे जातांना दिसल्या. पाहिल्याचे समाधान व्यक्त करत होत्या. सकाळ पासूनच रस्ताच्या दुतर्फा वाळकी, कौडगाव, नांदगाव, चिंचोली, हातणी, कामळज येथून लोक राहूल गांधी यांना पाहण्यासाठी आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT