Nisar tamboli
Nisar tamboli Sarkarnama
मराठवाडा

Bharat Jodo Yatra : राहुल गांधीच्या यात्रेत डिआयजी निसार तांबोळी पोलिसांना म्हणाले, 'हाऊज द जोश..'

सरकारनामा ब्यूरो

अर्धापूर : भारत जोडो यात्रेचे नांदेड जिल्ह्यात प्रवेश झाल्यानंतर अहोरात्र सुरक्षा कवच देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे कौतुक करुन शाबासकीची थाप नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी मारल्याने एक वेगळाच जोश निर्माण झाला. गेली पाच दिवस न थांबता, न थकता कर्तव्य पार पडल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील पोलीसांनी हिंगोली जिल्ह्यातील पोलीसांना सुरक्षेची जबाबदारी नांदेड हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर सोपवली.

नांदेड जिल्ह्यात भारत जोडो यात्रेने गेल्या पाच दिवसांपासून मार्गक्रमण केले. या पाच दिवसात नांदेड जिल्ह्याचे काही दिवसांपूर्वीच सूत्र स्वीकारल्यावर श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील अनुभवी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था पार पडली.

जिल्ह्यातील पाच दिवस मार्गक्रमण केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला. पार्डी येथील विश्रांती दरम्यान विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट घेऊन कौतुकाची थाप मारली. त्यामुळे एक वेगळाच जोश निर्माण झाला. यावेळी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, निलेश मोरे आदी पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निसार तांबोळी यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत फोटो ही काढले.

गेल्या पाच दिवसांत अनुभवी अधिकाऱ्यांच्या मदतीने सुरक्षा यंत्रणा राबविली. यात २५० अधिकारी व अडीच हजार कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सुरक्षा व्यवस्था पार पाडणे कसरतीचे असते, रस्त्यावरची परिस्थिती सतत बदलत असते, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT