Dr.Bharti Pawar, Central State Health Minister
Dr.Bharti Pawar, Central State Health Minister Sarkarnama
मराठवाडा

मंत्र्यांच्या खाजगी रुग्णालयातील उपचारावरील खर्चाच्या प्रश्नावर भारती पवारांनी हात जोडले..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी सरकारी खर्चाने खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत लाखो रुपये खर्च केले. (Aurangabad) कोरोना काळात सामान्य माणसाला बेड, आॅक्सीजन मिळत नसतांना मंत्र्यांनी मात्र जनतेचा पैसा स्वःताच्या उपचारावर खर्च केला. (Dr.Bharati Pawar) यावरून सामान्यामंधून संताप व्यक्त होत आहे.

या संदर्भात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी अक्षरशः हात जोडत यावर बोलणे टाळले. (Corona) चिकलठाणा विमानतळावर प्रसार माध्यमांनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. परंतु कोरोना रुग्ण वाढी संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन करत त्यांनी काढता पाय घेतला.

देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर घाबरण्याचे कारण नाही, पण सतर्क राहा, असे आवाहन त्यांनी केले. डाॅ. भारती पवार म्हणाल्या, कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्र, मिझोरम,उत्तर प्रदेशातील काही भाग आणि दिल्लीत पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या मागील आठ ते दहा दिवसांपासून वाढली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकारने संबंधित राज्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे, राज्याने सुद्धा केंद्राच्या सूचनेप्रमाणे काम करावे. रुग्ण वाढत जरी असले तरी घाबरण्याची गरज नाही. परतु सण-उत्सव आहेत त्यामुळे काळजी घ्यावी. राज्यांनी देखील केंद्रांच्या सूचना व मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असेही त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT