Jalna Railway Station Sarkarnama
मराठवाडा

Jalna Railway Station Bhoomipujan: नरेंद्र मोदींच्या हस्ते जालन्यातील रेल्वे स्थानकाचे भूमिपूजन; रावसाहेब दानवेही उपस्थितीत राहणार

Marathwada News : अमृत भारत स्टेशन योजनेतंर्गत देशातील रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Jalna News : अमृत भारत स्टेशन योजनेतंर्गत दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील जालना आणि परतूरसह १३ रेल्वे स्थानकांचे् नुतनीकरण आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ५ ऑगस्टला ऑनलाईन पद्धतीने हे भूमीपूजन करण्यात येणार आहे.

जालना येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने जालन्यात नुकतीच आढावा बैठक पार पडली. या बैठकीस राजकीय पक्षांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

अमृत भारत स्टेशन योजनेतंर्गत देशातील रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. रेल्वे स्थानकांचा दर्जा सुधारण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे. जालना येथे रेल्वेस्थानकासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

देशभरातील निवडक रेल्वे स्थानकांना अमृत भारत रेल्वे स्टेशनचा दर्जा देणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. यानुसार मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाच्या अंतर्गत सावदा, रावेर, चाळीसगाव आणि पाचोरा या चार रेल्वे स्थानकांसह अन्य स्थानकांना अमृत भारत रेल्वे स्टेशनचा दर्जा मिळणार आहे.

या योजने अंतर्गत निवड करण्यात आलेल्या रेल्वे स्टेशनमध्ये आकर्षक आणि अद्ययावात सुविधा दिल्या जाणार आहेत. यात प्रवाशांसाठी सुविधा, इलेक्ट्रिक जिने, प्रशस्त फलाट, पार्कींग, यासंह अशा अनेक सोयीसुविधा पुरल्या जाणार आहेत. हे चारे रेल्वे स्टेशन्सचं रुप पालटणार असल्याचं निश्चित झालं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT