Bhumre-Shinde-Thackeray
Bhumre-Shinde-Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Bhumre : आता उद्धवसाहेब नाही, शिंदेसाहेब सांगतील तो आदेश पाळू..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्यात शिवसेनेची सत्ता आणि मुख्यमंत्री असतांना कामे होत नसतील तर काय करावे, कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची कामे मतदारसंघात होत नव्हती. याबद्दल आम्ही वारंवार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सांगत होतो, पण त्यांनी लक्ष दिले नाही. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह सहा मंत्री आणि अनेक आमदार इथे आहोत. यापुढे काय करायचे हे आता उद्धवसाहेब सांगतिल ते नाही तर एकनाथ शिंदेसाहेब सांगतिल तसेच होईल, असे स्पष्ट करत राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी बंड पुकारण्यामागचे कारण असल्याचे सांगितले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आघाडी सरकारमधील शिवसेनेचे (Shivsena) सहा मंत्री आणि ३५ हून अधिक आमदार सुरत मार्गे गुवाहाटीत आहेत. या बंडानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या सर्व बंडखोर आणि शिवसैनिकांना आवाहन करणारे निवेदन केले. त्यानंतर बंडखोरांची भूमिका काय? मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ते प्रतिसाद देतात का? हे जाणून घेण्यासाठी संदीपान भुमरे यांच्यांशी संपर्क साधण्यात आला होता.

प्रसार माध्यमाशी बोलतांना भुमरे यांनी आता आपण एकनाथ शिंदे सांगतिल तसाच निर्णय घेऊ असे सांगत आपण ठाम असल्याचे सांगितले. बंडखोरी नेमकी कशामुळे या प्रश्नावर भुमरे म्हणाले, राज्यात शिवसेनेची सत्ता आणि मुख्यमंत्री असतांना मंत्री आमदारांची कामे होत नसतील तर काय करावे ? मी तर कॅबिनेट मंत्री आहे, यापुढे मला आणखी काय पाहिजे, पण तरीही मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. मला वैयक्तिक काही नको, पण मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कामे झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे.

आम्ही शिवसेना सोडलेली नाही, बाळासाहेबांच्या विचारावरच आम्ही जात आहोत. काॅंग्रेस-राष्ट्रवादीकडून होणारा त्रास, रखडलेली काम याची माहिती आम्ही वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना देत होतो. आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४३ आमदार, मंत्री एकवटले आहेत, याला काहीतरी कारण असेल की नाही? असा प्रतिप्रश्न देखील भुमरे यांनी केला. उद्धव ठाकरेंनी सांगितले तर आपण सातव्या मजल्यावरून उडी मारू असे आपण बोललो होतो. पण आता एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत आम्ही राहू,याचा पुनरुच्चार देखील भुमरे यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT