Elelction Card News 
मराठवाडा

Elelction Card News : बोगस मतदान टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय...

सरकारनामा ब्युरो

Latur News : आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाकडून यादी शुद्ध करण्याचे काम सुरू आहे. यासाठी संगणक प्रणालीतून सारख्या चेहऱ्यांच्या मतदारांचा शोध घेतला जात आहे. त्यानुसार जिल्ह्यात ७३ हजार मतदार सारख्याच चेहऱ्याचे निघाले असून, त्यांचे नाव एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी पडताळणी करण्यात येत आहे.

याबाबत बीएलओ स्तरावर सूचना करण्यात आल्या आहेत. बोगस मतदारांना आळा बसावा, यासाठी निवडणूक आयोगाकडून अत्याधुनिक संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली दोन ठिकाणी नाव असल्यास, चेहऱ्यात साम्य असल्यास निवडणूक विभागाला कळविणार आहे. जिल्ह्यातही या मोहिमेला गती देण्यात आली असून, प्रशिक्षणही पूर्ण करण्यात आले असल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले. सारख्या चेहऱ्यांच्या मतदारांचे दोन ठिकाणी नाव असल्याने चेहयांत साम्य येत आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी नाव ठेवण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. यामध्ये प्रारंभी पडताळणी करण्यात येत असून, मतदारांशी संपर्क साधून कोणत्या एका ठिकाणी नाव ठेचावे, याबाबत विचारणा करण्यात येत आहे. या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, बीएलओ स्तरावर सूचना केल्या आहेत.

राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. यासाठी मतदार नोंदणी संक्षिप्त पुन:निरिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यात एकसारखा फोटो पण वेगवेगळी नावं असलेले तब्बल ७३ हजार मतदार लातूरमध्ये आढळले आहेत. निवडणूक आयोगानं केलेल्या तपासणीमध्ये ही आकडेवारी उघड समोर आली आहे.

निवडणुकीच्या मतदान ओळखपत्रावर एक लाखांपेक्षा जास्त चेहरे एकसारखे असल्याबाबतही आयोगाने माहिती दिली आहे. काही चेहरे जुळी भावंड असल्यानं एकसारखी आहेत. तर काही चेहरे अस्पष्ट अशी आहेत. तर काहींनी पूर्वीच्या ठिकाणी केलेली नोंदणी रद्द न करता नवीन ठिकाणी नवीन नोंद केल्याने असे प्रकार उघडकीस आले आहेत. तर काही ओळखपत्रांवर एकाचे नाव आणि फोटो दुसऱ्याचाच छापून आल्याचेही हा प्रकार सूत्रांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT