Dhananjay Munde-Pankaja Munde
Dhananjay Munde-Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

धनंजय मुंडेंना मोठा दिलासा : पंकजांना पुन्हा देणार आव्हान

सरकारनामा ब्यूरो

बीड : परळीतील (Parli) वैद्यनाथ महाविद्यालयाच्या निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह ४०० जणांना मतदान करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. गेल्या तेरा वर्षांपासून कोर्टात सुरू असलेल्या या प्रकरणात धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वैद्यनाथ महाविद्यालयाच्या निवडणुकीत आगामी काळात पंकजा मुंडे (Pankaja Munde) विरोध धनंजय मुंडे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. (Big relief for Dhananjay Munde in Vaidyanath College case)

वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समितीवर सदस्य म्हणून काम करण्यास धनंजय मुंडे यांच्यासह ४०० जणांना न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे मुंंडे बहीण-भावांमधील संघर्ष पुन्हा एकदा नव्या क्षेत्रात पहायला मिळणार आहे, हे मात्र निश्चित.

परळी आणि बीडमधील प्रत्येक क्षेत्रात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे असा संषर्घ यापूर्वी आपण पाहिला आहे. या बहिण-भावांमधील संघर्ष टोकाला गेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा, साखर कारखाना अथवा बॅंका या सर्वच क्षेत्रात पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात संघर्ष झालेला आहे. आता हाच संघर्ष शिक्षण क्षेत्रातही दिसून येणार आहे. कारण, परळी शहरात जवाहर एज्युकेशन सोसायटीचे वैद्यनाथ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी, त्यांचे बंधू यांच्यासह ४०० जणांना मताचा अधिकार नव्हता. तांत्रिक कारणामुळे तो अधिकार गोठविण्यात आलेला हेाता. त्यामुळे २००९ पासून हे प्रकारण न्यायालयात होतं. अखेर त्याचा निकाल लागला आहे, त्यामुळे या ४०० जणांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे.

पंकजा मुंडे यांचं या महाविद्यालयावर वर्चस्व असताना धनंजय मुंडे यांच्याकडून काही तक्रारी करण्यात आल्या होत्या. महाविद्यालयाची चौकशी लावली होती. मात्र, आगामी काळात वैद्यानाथ महाविद्यालयावर वर्चस्वाची लढाई रंगणार हे आता स्पष्ट झाले आहे. हा सामना पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT