लातूर : आज एका बाजूला काँग्रेसने (Congress) लातूर जिल्ह्यात मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) जोरदार धक्का दिला असून त्यात भाजपला देखील दणका बसला आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस नेते आणि लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या ताकदीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
मात्र त्याचवेळी दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीने अवघ्या काही तासातच याची परतफेड केली असून राष्ट्रवादी काँग्रेसने लातूर जिल्ह्यातीलच काँग्रेसच्या बड्या नेत्याला आपल्या गळाला लावलं आहे. लातूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लातूरचे माजी नगराध्यक्ष व्यंकट बेंद्रे यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अमित देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बेंद्रे यांना मोठे पद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बेंद्रे २०१० - २०२० असे जवळपास १० वर्षे लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे ते अत्यंत विश्वासू आणि कट्टर समर्थक मानले जायचे. अध्यक्षपदाच्या काळात बेंद्रे यांनी अनेक चढ उतार पाहिले. विलासराव देशमुख राज्यात मुख्यमंत्री आणि पुढे केंद्रात मंत्री असताना बेंद्रे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. पक्षांतर्गत मतभेद होणार नाहीत याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली.
मात्र बेंद्रे यांचा स्पष्ट वक्तेपणा कधी कधी अडचणीचाही ठरला. त्यातूनच २०१७ मध्ये तर त्यांनी पक्षाकडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामाही सादर केला होता. पण तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तो नामंजूर केला होता. त्यांच्याकडेच जिल्हाध्यक्षपद कायम ठेवले होते. त्यानंतर ते पुन्हा सक्रिय झाले. पण २०२० मध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खांदेपालट केली अध्यक्षपद मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि तत्कालिन जिल्हा उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्याकडे दिले. तेव्हापासूनच ते नाराज होते. अखेरीस आज बेंद्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.