Omprakas Rajmimbalkar Sarkarnama
मराठवाडा

खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का; पवनराजेंचे विश्वासू सहकारी शिंदे गटात प्रवेश करणार

शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या कार्यशैलीला कारणीभूत ठरवले आहे.

सरकारनामा ब्यूरो

उस्मानाबाद : शिवसेना (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omprakash Rajemimbalkar) यांना मोठा धक्का बसला आहे. ओमराजेंचे वडिल पवन राजेनिंबाळकर यांचे विश्वासू सहकाऱ्यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या कार्यशैलीला कारणीभूत ठरवले आहे. (Big shock to Shiv Sena MP Omprakash Rajemimbalkar; Pawan Raje's trusted colleague will enter Shinde group)

खासदार राजेनिंबाळकर यांचे पिताश्री (स्व.) पवन राजेनिंबाळकर यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी आता पवनराजे मित्रमंडळही बरखास्त केल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. पवनराजे मित्र मंडळाचे अध्यक्ष काकासाहेब खोत, तेरणा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रमाकांत टेकाळे, पवनराजेंचे सहकारी श्यामराव कुलकर्णी, सत्यनारायण लोमटे यांनी पत्रकार परिषद घेत ओमराजेंवर निशाणा साधत शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पवनराजेंचे सहकारी श्यामराव कुलकर्णी म्हणाले की, पवनराजे मित्रमंडळातील कार्यकर्त्यांना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून न्याय दिला जात नव्हता. या मित्रमंडळातील कार्यकर्त्यांना कोणतीही कामे देण्यात आलेली नाहीत.

या पत्रकार परिषदेत पवनराजेंच्या एकेकाळच्या सहकाऱ्यांनी ओमराजेंवर अनेक आरोप केले आहेत. पवन राजेनिंबाळर यांच्या हत्येनंतर पवनराजे मित्रमंडळाच्या १८८ शाखांमधील कार्यकर्ते ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. त्या बळाच्या जोरावरच ओमराजे यांना राजकारणात महत्वाचा असलेला तेरणा सहकारी साखर कारखाना जिंकता आला होता. तसेच, विधानसभेची निवडणूकही या मित्रमंडळातील पाठिंब्याच्या जोरावर त्यांना जिंकता आली होती. मात्र, आमदार आणि खासदार झाल्यानंतर ओमराजेंनी त्याची जाणीव ठेवली नाही, असा आरोपही पवनराजेंच्या सहकाऱ्यांनी ओमराजेंवर केले.

ओमराजे निंबाळकरांकडून मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळत नाही, त्यांना न्याय मिळत नाही. खासदारांच्या या कार्यशैलीला कंटाळूच आम्ही पवनराजे मित्रमंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. उस्मानाबादचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच आम्ही शिंदे गटात प्रवेश करणार आहोत. त्यासाठी तेरणा सहकारी कारखाना परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्याचे नियोजन असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT