Amit Shah Bhagwat Karad sharad Pawar sarkarnama
मराठवाडा

Bhagwat Karad : शरद पवारांची टीका भाजपच्या जिव्हारी, थेट सुप्रीम कोर्टाची काढली आठवण

Bhagwat Karad sharad Pawar : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही भाजपची भूमिका आहे. भाजपा ओबीसींना देखील न्याय देणारा पक्ष आहे, असे कराड यांनी सांगितले.

Roshan More

Bhagwat Karad News : भाजपच्या अधिवेशनात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा उल्लेख भ्रष्टाचाराचे सरदार असा करत टीका केली होती. शरद पवार यांनी देखील शाह यांना चोख प्रत्युत्तर देत ज्या माणसाला सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केले आहे. त्याच्या हातात देशाचं गृहमंत्रीपद आहे, अशी घणाघाती टीका केली होती.

ही टीका भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे पवारांना प्रत्युत्तर देण्याची नेत्यांमध्ये चढाओढ दिसत आहे. माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी पवार यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

'शरद पवारांनी अमित शाह यांच्यावर केलेली टीका चुकीची आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल शरद पवारांना माहीत असायला पाहिजे होता.', असे भाजप नेते, केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी म्हणत शरद पवार यांच्या टीकेला उत्तर दिले.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही भाजपची भूमिका आहे. भाजपा ओबीसींना देखील न्याय देणारा पक्ष आहे, असे कराड यांनी सांगितले. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी फडणवीस-जरांगे भांडण नाटक असल्याची टीका केली होती , यावर कराड यांनी आपण आंबेडकरांच्या विधानाशी सहमत नसल्याचे सांगितले.

'तो' दिवा मी जेलमध्ये पाहिला

भाजपकडून शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे, अशी टीका केली होती. या टीकेला शरद पवारांनी 'तो' दिवा मी महाराष्ट्राच्या तुरुंगात पाहिला होता, असा टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT