chandrashekhar bawankule Reaction on Rally News, Aurangabad
chandrashekhar bawankule Reaction on Rally News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Bjp : साडेचार तास झाल्याने लोक कंटाळले होते, मोदी, शहांच्या सभेला बघा कशी गर्दी होते..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad News : भाजपच्या मिशन लोकसभेला चंद्रपूर आणि औरंगाबादेतील जाहीर सभेने सुरुवात झाली. चंद्रपूरातील सभेला गर्दी जमली, (Aurangabad)औरंगाबादेत मात्र फज्जा उडाला. नड्डांचे भाषण सुरू असतांना लोक उठून गेल्याने भाजपची नाचक्की झाली. या फ्लाॅप सभेवरून स्थानिक नेत्यांची खरडपट्टी होत असतांना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मात्र अजबच दावा केला आहे.

अहो, नड्डासाहेबांच्या सभेला (Marathwada) मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर गर्दी झाली होती, चारवाजेपासून लोक, महिला आलेल्या होत्या. त्यात पाण्याची आणि स्वयंपाकाची वेळ झाल्यामुळे महिला सभेच्या ठिकाणाहून उठून गेल्या, असा दावा बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर आता सोशल मिडियावर पुन्हा सभेतील रिकाम्या खुर्च्या आणि लोक उठून जातांनाचे फोटो व्हायरल केले जात आहेत.

२ जानेवारी रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची जाहीर सभा झाली. दोन केंद्रीय मंत्री, राज्यातील सहकारमंत्री व राज्य, देशपातळीवरच्या नेत्यांची उपस्थितीत असून देखील या सभेला जेमतेम पाच हजारांची गर्दी जमली होती. नड्डा यांचे भाषण सुरू असतांनाच काही महिला उठून गेल्या, त्यामुळे सभा फसल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

कराड पिता-पुत्रांनी सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता सगळे नियोजन हाती घेतल्याचा फटका देखील सभेला बसल्याची चर्चा आहे. परंतु सभा फ्लाॅप झाली हे भाजप अजूनही मान्य करायला तयार नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर सभेला २५ हजारांची गर्दी झाली होती, पाहिजे तर तुम्हाला व्हिडिओ देतो, असा दावा प्रसार माध्यमांशी बोलतांना केला.

एका सभेचे काय घेवून बसलात यापुढे मोदीजी, शहा यांच्या सभा देखील होणार आहेत, तेव्हा किती गर्दी होते ते पहा. काही भागात पाणी आल्यामुळे आणि सभेला उशीर झाल्याने स्वयंपाक करायचा म्हणून महिला उठून गेल्यामुळे रिकाम्या खुर्च्यांचे फोटो छापून आले आहेत. सभा चांगलीच झाली, गर्दी देखील होती, पण आम्हाला सभा सुरू करायला उशीर झाला, अशी कबुली देखील बावनकुळे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT