<div class="paragraphs"><p>Bjp Leader Vijay Rahatkar</p></div>

Bjp Leader Vijay Rahatkar

 

Sarkarnama

मराठवाडा

मोदींच्या सभेला जमलेल्या गर्दीचे फोटो भाजपने आणले समोर; मग हे काय? काॅंग्रेसला सवाल..

जगदीश पानसरे

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला पंजाबमधील फिरोजपूर येथील पुलावर २० मिनिटे थांबावे लागले. (Pm Narendra Modi) समोर आंदोलकांनी रस्ता अडवल्यामुळे प्रचार सभा व इतर सगळे कार्यक्रम रद्द करून पंतप्रधानांना माघारी फिरावे लागले. (Bjp) यावरून भाजप विरुद्ध पंजाबमधील काॅंग्रेस (Congress) सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेत गंभीर चूक झाल्याचा आणि त्याला पंजाबचे मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप देखील भाजपकडून केला गेला. काॅंग्रेसने मात्र हे आरोप फेटाळून लावत उलट मोदींच्या सभेला गर्दीच नव्हती म्हणून ते परत गेल्याचा दावा केला होता. यासाठी सभा स्थळावरील रिकाम्या खुर्च्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आले होते.

काॅंग्रेसच्या या दाव्याला भाजपने देखील प्रत्युतर देत सभेला जमलेल्या गर्दीचे फोटो व्हायरल करत मोदींच्या पंजाब मधील सभेला गर्दी नव्हती, तर मग हे काय आहे? असा सवाल देखील केला आहे. आता या दोन्ही पक्षांनी केलेले दावे आणि फोटो, व्हिडिओमधील सत्य नेमके काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी आपल्या फेसबुक पेजवरून मोदी यांच्या सभेला जमलेल्या गर्दीचे फोटो व्हायरल केले आहेत. ` अगर पीएम नरेंद्र मोदीजी की पंजाब रैली मे भीड नही थी तो ये क्या थी? असा प्रश्न देखील रहाटकर यांनी उपस्थित केला आहे. मोदींच्या सुरक्षा यंत्रणेवरून पंजाब सरकार व काॅंग्रेसवर भाजपकडून आरोप केले गेले तेव्हा देशासह महाराष्ट्रातील काॅंग्रेस नेत्यांनी देखील भाजपवर टीका केली.

काॅंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यापासून ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सुरक्षेचा कारणावरून नाही, तर सत्तर हजार लोकांची व्यवस्था केलेल्या सभास्थळी सातशे लोकही नव्हते म्हणून मोदी सभा न घेताच परतले असा दावा केला होता. आता भाजपने व्हायरल केलेल्या फोटोवर काॅंग्रेसकडून काय उत्तर येते याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT