Chandrashekhar Bawankule-Raosaheb Danve News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Teacher Constituency : भाजपचा उमेदवार यावेळी निवडून आणूच, दानवेंनी दिली प्रदेशाध्यक्षांना खात्री..

Bjp : विजय आणि पराभव यामधील जो गॅप आहे, तो यावेळी राहणार नाही आणि आपला उमेदवार निश्चित निवडून आणू

सरकारनामा ब्युरो

Raosaheb Danve : राज्यात शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली असलेले सरकारच शिक्षकांचे प्रश्न सोडवू शकते यांची खात्री शिक्षक आणि जनतेला झाली आहे. त्यामुळे गेल्या काही निवडणुकांमध्ये या शिक्षक मतदारसंघात थोडक्यात झालेला पराभव यावेळी होणार नाही. विजयात राहिलेला गॅप यावेळी आम्ही भरून काढू आणि किरण पाटील यांना विजयी करू, असा विश्वास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठवाड्याच्या वतीने दिला.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे (Bjp) भाजप उमेदवार किरण पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, (Marathwada) मराठवाड्यातील आमदार, खासदार, जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी आयोजित शिक्षक मेळाव्यात रावसाहेब दानवे यांनी भाजप ही जागा जिंकेल असा दावा केला.

दानवे म्हणाले, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले आहेत. आपला आमदार या मतदारसंघात नसतांना देखील आपण शिक्षकांच्या अनेक समस्या सोडवण्यात यशस्वी झालो. आता राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. त्यामुळे शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न हेच सरकार मार्गी लावू शकेल यांची खात्री शिक्षकांना निश्चित आहे.

त्यामुळे किरण पाटील यांच्या सारख्या नवख्या पण शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिली. याआधी देखील भाजपने सुशील पत्की यांच्यासह अनेकांना संधी दिली. पण त्यांचा अगदी थोड्या फरकाने पराभव झाला.

विजय आणि पराभव यामधील जो गॅप आहे, तो यावेळी राहणार नाही आणि आपला उमेदवार निश्चित निवडून आणू, असा शब्द मी मराठवाड्याच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देत असल्याचे सांगत दानवेंनी किरण पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT