Anjali Damania 1 Sarkarnama
मराठवाडा

Anjali Damania : अंजली दमानियांना 'तो' उल्लेख भोवला; भाजपकडून टीका, तर गुन्हा दाखल करण्यासाठी 'ठिय्या'

BJP Anjali Damania crime in politics Santosh Deshmukh murder Case Beed : अंजली दमानिया बीडमधील गुन्हेगारीविरोधात लढताना, जाती उल्लेख करत समाज माध्यमांवर केलेल्या पोस्टवरून अडचणीत आल्या आहेत.

Pradeep Pendhare

Mumbai News : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच्या राजकारणातील गुन्हेगारीविरोधात 'सत्'यशोधक आंदोलन सुरू करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या एका पोस्टमुळे अडचणीत आल्या आहेत.

त्यांनी काल समाज माध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये जातीचा उल्लेख केला म्हणून बीडमध्ये त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तसेच भाजपकडून देखील टीका करण्यात आली आहे.

अंजली दमानिया यांच्या पोस्टवर भाजपचे (BJP) प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी टीका करताना गंभीर आरोप केले आहे. अंजली दमानिया खरचं समाजसेवक आहेत का? दमानिया जातीजातीमध्ये तेढ निर्माण करतात. अंजली दमानिया यांनी काल समाज माध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये, बीड जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट समाजाचे लोकं काम करतात, तसे म्हणताना जाहीरपणे उल्लेख करताना एका समाजाचा उल्लेख केला. कुठलाही समाजसेवक जाती जातीमध्ये दरी वाढेल, असं वक्तव्य करत नाही. पण अंजली दमानिया कुठल्याही प्रकारची माहिती न घेता जास्त बोलतात, असा टोला राम कुलकर्णी यांनी लगावला.

बीडमधील (BEED) कलेक्टर, एसपी, आरडीसी, सीईओ याशिवाय उच्च पदस्थ अधिकारी कोणत्या समाजाचे आहेत, याची माहिती न घेता, आरोप केला. बीड जिल्ह्याला टारगेट करताना, तुम्ही इतर प्रश्नावर देखील लक्ष द्या, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत असाल किंवा भांडण लावत असाल, तर तुम्ही समाजसेवक नाहीत, असे खडेबोल राम कुलकर्णी यांनी सुनावले आहेत.

दरम्यान, अंजली दमानिया यांच्याविरोधात बीडमधील समाज बांधव आक्रमक झाले आहे. दमानिया यांच्या पोस्टमुळे दोन समाजात तेढ निर्माण झाली आहे. दमानिया यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. गुन्हा दाखल करण्याबरोबरच, काहींनी ठिय्या आंदोलन देखील केले.

राजकीय वापर चुकीचा...

अंजली दमानिया यांनी यावर पुन्हा समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत, "माझ्या विधानाबद्दल, मोठ्या प्रमाणात जाणून बुजून समाजात गैरसमज पसरवण्याचे काम हे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड समर्थक करत आहेत. मी समाजातील लोकांबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल मी मुळीच बोलत नाही, तसे बोलण्याचे कारण देखील नाही. मला पूर्ण कल्पना आहे की, हा समाज अतिशय भोळा, कष्टाळू आणि मेहनतीतून पुढं आला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी या समाजाला मदतीचा हात दिला, त्या देखील काही चुकीचे नाही. चुकीचे आहे, त्यांचा राजकीय वापर करणे, जे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सर्रास करत आहेत", असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT