Modi PM Again In 2024 News, Aurangabad
Modi PM Again In 2024 News, Aurangabad  Sarkarnama
मराठवाडा

Bjp : चारशे खासदार अन् पुन्हा मोदी पंतप्रधान मिशनसाठी भाजप सज्ज..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे चारशे पेक्षा अधिक खासदार निवडून आले पाहिजेत, यासाठी अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती (Bjp) भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा शहर-जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री भुपेंद्रसिंह यादव हे दोन दिवसांच्या (Aurangabad)औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. या सदंर्भात भाजपच्या वतीने प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

मोदींना पुन्हा पंतप्रधान आणि देशात सर्वाधिक भाजपचे खासदार निवडून आणण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्र्यांचा प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा दौरा आखण्यात आला आहे. (Pm Modi) ज्या मतदारसंघात भाजप कधीच लढली नाही, अशा मतदारसंघांमध्ये विशेष रणनीती आखण्यात आली आहे.

त्यासाठी भाजपने १४४ पेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघांमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरली असून त्या अभियानाचा भाग म्हणून केंद्रीय वने व पर्यावरण, रोजगार मंत्री भूपेंद्र सिंग यादव हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांमध्ये ३० सप्टेंबर व १ आॅक्टोबर रोजी येणार आहेत.

या अंतर्गत विविध समाज घटकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. संघ कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत देखील त्यांची बैठक होणार आहे. बुथ प्रमुख ,पन्ना प्रमुख व प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख, भाजप कोअर कमिटीची बैठक देखील या दौऱ्यात होणार आहे. मोदी सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचतात का? याचा देखील ते आढावा घेणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT