Pravin Darekar- Sanjay Raut Sarkarnama
मराठवाडा

Bjp : एक-दोन मतं इकडं तिकडं झाली असती, तर संजय राऊतांची दांडी गूल झाली असती..

याचा कसलाही विचार न करता बडबड करायची, ईडीला, केंद्र सरकारला शिव्या घालायच्या हे त्यांचे सुरूच आहे. आम्ही फक्त शांतपणे हे ऐकतोय, पाहतोय. मात्र काय करतो हे देवेंद्रजींनी दाखवून दिले. (Beed)

सरकारनामा ब्युरो

बीड : शिवसेनेचे नेते संजय राऊत कसबसे निवडून आले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा पहिल्या क्रमाकांचा उमेदवार सहाव्या क्रमाकांवर निवडून येतो आणि आमचा तिसऱ्या क्रमाकांचा उमेदवार पहिल्या क्रमांकावर निवडून येतो. (Sanjay Raut) संजय राऊत यांनी याचा जरा विचार करायला हवा, थोडी लाज, शरम बाळगायला हवी. एक-दोन मतं जर इकडची तिकडं झाली असती तर तुमची दांडी गुल झाली असती, असा टोला भाजपचे प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी लगावला.

संजय राऊत यांनी आता तरी बडबड बंद करावी, अशी टीका देखील त्यांनी केली. (Beed) बीड येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना दरेकर यांनी शिवसेना व संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. विशेषतः संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराच्या पराभवानंतर भाजपवर ईडीचा दबाव आणल्याची टीका केली होती. यावर भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

दरेकर यांनी देखील राऊत यांना काठावर विजय मिळाल्याची आठवण करून दिली. दरेकर म्हणाले, एवढी आपली वाईट अवस्था झाल्यानंतर, मला वाटतं आठवडाभर त्यांनी बडबड बंद केली पाहिजे होती. शिवसेनेचा प्रथम क्रमांकाचा उमेदवार, सहाव्या क्रमांकावर जिंकून येतो आणि आमचा तिसऱ्या क्रमांकाचा उमेदवार संजय राऊत पेक्षा जास्त मत घेतो. याची काही लाज शरम बाळगा.

म्हणजे आपलं काय चाललंय, एक दोन मते जरा इकडे तिकडे झाली असती, तर संजय राऊतांची दांडी उडाली असती. पण याचा कसलाही विचार न करता बडबड करायची, ईडीला, केंद्र सरकारला शिव्या घालायच्या हे त्यांचे सुरूच आहे. आम्ही फक्त शांतपणे हे ऐकतोय, पाहतोय. मात्र काय करतो हे देवेंद्रजींनी दाखवून दिले आहे.

दरम्यान, बीड उस्मानाबादच्या सीमेवर प्रवीण दरेकर यांच्या गाड्यांचा ताफा पंकजा मुंडे समर्थकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दरेकर यांच्या विरोधात मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. यावर दरेकर म्हणाले, ते कार्यकर्ते मला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी भेटून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ताफा वगैरे अडवला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT