Imtiyaz Jaleel, Bhagwat Karad
Imtiyaz Jaleel, Bhagwat Karad sarkarnama
मराठवाडा

Bhagwat Karad : '..एकतरी भाजपवाला दाखवा ; कराडांचे इम्तियाज जलीलांना आव्हान

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : केंद्रात अर्थ राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ.भागवत कराड (Bhagwat Karad)यांनी राष्ट्रीयकृत बँकांचे जाळे ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे, यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel)यांनी टीका केली होती. त्याला डॉ. कराड यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

भागवत कराड यांच्या पुढाकारातून नुकताच राष्ट्रीयकृत बँकांचा कर्जवाटप मेळावा झाला. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सडकून टीका केली. "गोरगरीब गरजूंना कर्ज वाटप न करता आपल्या राजकीय स्वार्थासाठी धनदांडग्यांना कोट्यावधींचे कर्ज वाटप केले जाते," असा आरोप इम्तियाज यांनी केला होता. त्याला कराड यांनी प्रत्युत्तर देत कर्ज वाटपात एक तरी भाजपवाला दाखवा,असे आव्हान दिले आहे.

याशिवाय केंद्राच्या विविध योजनांचा लाभ सामान्य माणूस व नव्यानेच व्यवसाय करू पाहणाऱ्या उद्योजक व स्टार्टअप करू पाहणाऱ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्याचाच भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेत कराड यांनी देशातील नामांकित राष्ट्रीयकृत बँकांच्या मार्फत तब्बल 2900 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचा कार्यक्रम घेतला. मात्र यानंतर यावरून राजकारण सुरू झाले.

हा कर्ज मेळावा म्हणजे आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांचा गैरवापर असल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटले होते. धनदांड्यांना कर्ज वाटप करण्यासाठी सरकारी बँका या कराड यांच्या जहागीर आहेत का? असा सवाल देखील इम्तियाज यांनी केला होता. कर्ज वाटपामध्ये भाजपचे पदाधिकारी आणि बड्या नेत्यांना आर्थिक बळ देऊन आपली खुर्ची व राजकीय अजेंडा रेटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप देखील इम्तियाज यांनी केला होता.

या आरोपानंतर डॉ. कराड यांनी देखील इम्तियाज यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. कराड म्हणाले, "एकीकडे केंद्र सरकारवर उद्योजकांना कर्ज पुरवठा केला जात नाही असा आरोप करायचा आणि दुसरीकडे त्याला राजकीय अजेंडा म्हणायचा हा दुटप्पीपणा विरोधकांनी करू नये. केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्यात यासाठी मी अर्थराज्यमंत्री झाल्यापासून प्रयत्नशील आहे,"

"कर्ज मेळाव्यातून ज्या लोकांना कर्ज वाटप करण्यात आले आहे त्यात एकही भाजपवाला नाही. उलट इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील,असे म्हणत कराड यांनी इम्तियाज जलील यांचे आरोप फेटाळले. शैक्षणिक कर्ज मिळत नसल्याचा मुद्दा इम्तियाज यांनी उपस्थित केला होता यावर देखील आपण मार्ग काढणार आहे," असे कराड म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT