Former MLA Sangeeta Thombre Sarkarnama
मराठवाडा

Sangeeta Thombre : नवे व्हिजन घेऊन माजी आमदार संगीता ठोंबरे मैदानात; विधानसभा लढवण्यावर ठाम

Former MLA Sangeeta Thombre kej Assembly Constituency : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने संगीता ठोंबरे यांना उमेदवारी नाकारुन त्यावेळी राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झालेल्या नमिता मुंदडा यांना रिंगणात उतरविलं होतं.

प्रशांत बर्दापूरकर

Beed News, 31 July : मांजरा धरणात 3 टीएमसी पाणी आणणे, एमआयडीसी उभी करणे, सूत गिरणीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, अंबाजोगाई जिल्हा निर्मीतीसाठी प्रयत्न असे नवे व्हिजन घेऊन भाजपच्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे पुन्हा राजकीय मैदानात उतरल्या आहेत.

105 गावांचा दौरा करुन जनभावना समजून घेतल्या असून केज विधानसभा मतदार संघातून भाजपकडे दावेदारी करणार असल्याचे संगीता ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे. प्राध्यापक असलेल्या संगीता ठोंबरे 2012 च्या केज विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रथम राजकारणात आल्या.

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांना पोटनिवडणुकीत भाजपची उमेदवारी दिली. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे यांच्याकडून प्रा. संगीता ठोंबरे पराभूत झाल्या. मात्र, पुढच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता मुंदडा यांचा पराभव करुन ठोंबरे यांनी भाजपच्या आमदार झाल्या.

पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) संगीता ठोंबरे यांना उमेदवारी नाकारुन त्यावेळी राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झालेल्या नमिता मुंदडा यांना रिंगणात उतरविले. दरम्यान, आम्ही पाच वर्षे थांबलो, आता मात्र 2024 मध्ये पक्षाने आपणास पुन्हा एकदा संधी दिली तर आपण केज विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे ठोंबरे म्हणाल्या आहेत.

2012 मध्ये आपण लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात सक्रीय झालो, पुढे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नेतृत्वाखाली काम केले. 2014 ते 2019 या कालावधीत आमदार असताना ठरवलेली सर्व कामे करून जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविले.

भावी राजकारणात सक्रीय होत असताना मतदार संघातील 105 गावच्या जनतेच्या लोकभावना जाणून घेऊन आपण पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याचे ठरविले असल्याचे त्या म्हणाल्या. पक्षाने थांबायला सांगीतल्याने मध्यंतरी चार वर्षे आपण कुठेच राजकीय व सामाजिक उपक्रमात सहभागी नव्हता, या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, पक्षानेच आपणाला थांबायला सांगितले होते. तरीही सामान्य जनतेच्या कामासाठी आपले प्रयत्न सुरू होते.

भाजपने संधी न दिल्यास इतर पक्षाकडे आपली दावेदारी असेल का? यावर बोलताना पक्षावर आपला विश्वास आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षाचा सध्यातरी विचार केला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT