Jalna Constituency Assembly  Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve: मी कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही, चांगल्या चांगल्यांचे मी मुडदे पाडलेत! दानवेंनी खोतकरांना सुनावले खडेबोल

Jalna Constituency Assembly Vidhan Sabha Election BJP vs Shivsena: शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनी यांनी एका कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. त्याला दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सरकारनामा ब्यूरो

माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लोकसभेतील पराभवाचे शल्य अजूनही आहे. माझ्या पराभवाचे क्रेडिट काही जण घेत आहेत. पण आम्ही महायुतीतील नेते असून पक्षांशी बेईमानी करणार नाही, असे सांगत अप्रत्यक्षपणे दानवे यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर निशाणा साधला.

अनेक महाभाग आपल्या पराभवाचे क्रेडिट घेत आहेत. पण रावसाहेब दानवे हा काही कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही, चांगल्या चांगल्यांचे मी मुडदे पाडलेत असं म्हणत दानवेंनी खोतकरांनी खडेबोल सुनावले आहेत. जालना येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी दानवे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर चांगलीच फटकेबाजी केली.

शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनी यांनी एका कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. त्याला दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जालना विधानसभेच्या तयारीसाठी घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांसमोर खोतकरांनी दानवेंवर टीका केली आहे.

"ज्यांनी संकटात टाकलं त्यांना कधी सोडायचं नसतं. त्यांच्यापासून सावध पण राहायचं असतं. आता आपल्याला सावध राहण्याची वेळ आली आहे. ज्या कपटी लोकांनी आम्हाला छळलं, आम्हाला त्रास दिला त्याचा सत्यानाश झाला," असे म्हणत अर्जुन खोतकर यांनी दानवे यांच्यावर यांच्यावर टीका करताना तोंडसूख घेतले होते.

जालना विधानसभा कोण लढणार यावरुन दानवे-खोतकर यांच्यामध्य रस्सीखेच सुरु आहे. भाजप आणि शिवसेना दोन्हीही जालना विधानसभेवर दावा केला आहे.

ही जागा सध्या एकनात शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. पण या जागेवर भाजपने दावा ठोकला आहे. त्यामुळे जालना विधानसभेच्या जागेवरुन राजकारण तापलं आहे. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे हे या जागेवरुन निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT