Bjp Meeting In Chhatrapati Sambhajinagar News Sarkarnama
मराठवाडा

Bjp Loksabha News : छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपच लढवणार ? जोरदार तयारी सुरू..

Marathwada : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघाची 'भाजपा बुथ सशक्तीकरण आढावा बैठक' संपन्न.

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : राज्यातील सत्तातंरानंतर मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघात लढण्याची तयारी (Bjp)भाजपकडून सुरू करण्यात आली आहे. शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार असलेल्या मतदारसंघात देखील भाजपने बैठकांचा धडका सुरू केला आहे. शिवसेना-भाजप युतीमुळे आतापर्यंत लढू न शकलेल्या लोकसभा मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

त्यापैकीच एक असलेल्या छत्रपती संभाजीनगरात भाजपने सर्वाधिक जोर लावला आहे. आतापर्यंत युतीमुळे हा मतदारसंघ (Shivsena) शिवसेना (ठाकरे) लढवत आला आहे. पहिल्यांदा इथे भाजपला लढण्याची संधी मिळणार आहे. (Atul Save) अर्थात शिंदे गटाने दावा सोडला तर ते शक्य होणार आहे. राज्याच्या सत्तेत सध्या जरी शिंदे मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष फ्रंट सीटवर असला तरी लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदलू शकते.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ भाजपच लढवणार असे चित्र सध्या दिसते आहे. वर्षभरावर निवडणूक आलेली असतांना शिंदे गटाकडून लोकसभा लढवण्या संदर्भात अद्याप एकही बैठक झालेली नाही. तर दुसरीकडे भाजपने मात्र आढावा बैठका घेत आगेकूच केली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री, खासदार अयोध्येत असतांना इकडे छत्रपती संभाजीनगरात मात्र भाजपा बुथ सशक्तीकरण आढावा बैठक पार पडली.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, शहर-जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बुथ प्रमुख व पदाधिकारी या बैठकीला उपस्थीत होते. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघाची 'भाजपा बुथ सशक्तीकरण आढावा बैठक' संपन्न झाल्याची माहिती देत मंत्री अतुल सावे यांनी स्थानिक पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सदर बैठक अतिशय उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT