Namita Mundada Sarkarnama
मराठवाडा

ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी आमदार नमिता मुंदडा करणार अन्नत्याग..

अतिवृष्टीमुळे बीडमध्ये (Beed) चार महिन्यात २० लोकांचे बळी गेले असून तब्बल ४३७ जनावरेही ठार झाली आहेत.

प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई : गेल्या १५ दिवसांपासून ढगफुटीसह झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) बीड (Beed) जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये हजारो पशुधन (जनावरे) मृत झाले. तसेच, जनजीवनही विस्कळीत झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना (Farmers) पीकविमा तातडीने देत, शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्यावी. या मागण्यांसाठी केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सोमवारी (ता .४ ऑक्टोबर) अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांचे एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन होणार आहे. यंदा बीड जिल्ह्यावर निसर्ग कोपला आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात जिल्ह्यातील चार महिन्यात २० लोकांचे बळी गेले असून तब्बल ४३७ जनावरेही ठार झाली आहेत.

तब्बल ११ वेळा अतिवृष्टी झाल्याने ६१ महसूल मंडळात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सव्वापाच लाख हेक्टरांवरील सोयाबीन, कपाशी, ऊस पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका केज विधानसभा मतदार संघातील केज, अंबाजोगाई व बीड तालुक्याला बसल्याचे नमिता मुंदडा यांनी सांगितले.

मुंदडा म्हणाल्या, "झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील माती खरडून गेली आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. आम्ही मागील आठ दिवसांपासून मतदारसंघात पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर देत आहोत." मात्र, आता सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा द्यावा, नुकसान भरपाईपोटी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी. या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्यायच नसल्याचे मुंदडा यांनी सांगितले. येत्या सोमवारी आमदार मुंदडा एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT