Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : जरांगेंचा बोलविता धनी सिल्वर ओक की जालन्यातील भैया फॅमिली? भाजप आमदार प्रसाद लाडांचा सवाल

Prasad Lad On Manoj Jarange : ज्या फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहेत...

Chetan Zadpe

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात फूट पाडून दुही माजवण्याचा काम सरकारने केले. मला वेळोवेळी मारण्याचा प्रयत्न केला. मी मराठ्यांचा नेता नसून सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा या नात्याने समाजासाठी काम करत आहे. मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना मला संपवायचे आहे. त्यांना मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, असे गंभीर आरोप करत मराठा मनोज जरांगे पाटील यांनी केला. यावर आता भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे तुमची नौटंकी बंद करा असे म्हणत, जोरदार टीका केली आहे. (Manoj Jarange Vs Devendra Fadnavis)

मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पाहिली. आता त्यांची नौटंकी आता त्यांनी बंद करावी. समाजाच्या नावाखाली मागच्या सात आठ वर्षात स्वत:चा राजकीय वरदहस्त करण्याचा प्रयत्न जो जरांगे राजकीय वरदहस्त करण्याचा जो प्रय् त्न करत होते, याचा मागचा बोलविता धनी कोण आहे? सिल्वर ओक आहे की जालन्यामधील भैय्या फॅमिली आहे. ये आता लोकांसमोर यायला लागलं. तुम्हाला दहा वेळा सांगितलं की फडणवीसांचं नाव घेऊ नका. ज्या फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहेत. ज्या फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं. फडणवीसांचं नाव घ्यायला तुम्हाला कोण लावतंय, आता हे पुढे आलंय. पुन्हा एकदा फडणवीसांनी आरक्षण दिल्यानंतर आपली खेळलेली खेळी संपली. हे आज लक्षात येतंय. समाजाच्या नावावर लेकरु लेकरु करुन ढेकरु देण्याचं बंद करा. आरक्षणामुळे मराठा समाज खूष आहे. तुमच्या सल्ल्याची समाजाला गरज नाही, असे प्रसाद लाड म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगेंचे फडणवीसांवर आरोप -

मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर गंभीर आरोप करत माझा बळी घ्यायचा तर घ्या. मात्र मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही. आजच सागर बंगल्यावर येतो, घाला मला गोळ्या, असे म्हणत जरांगे बोलता-बोलता जागेवरून उठले आणि स्टेजवरून उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी समाजबांधवांनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. (Maratha Reservation News)

मराठ्यांना ओबीसी (OBC) प्रवर्गातून आरक्षण द्यावे, सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारच्या वतीने अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण दिले. तसेच आंदोलनातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून खोटे आरोप करून मूळ मागणीला फाटा फोडण्याचा प्रयत्न केला. बारस्कारांच्या आरोपांमागे फडणवीस आहेत, असा आरोपही जरांगे पाटलांनी केला. त्यांनी मनात आणले तर लगेच सगेसोयऱ्यांची अमंलबजावणी करू शकतात, मात्र त्यांना तसे करायचे नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT