Suresh Dhas 4 Sarkarnama
मराठवाडा

Suresh Dhas : अजितदादा बीडचे पालकमंत्री झाले तर..; सुरेश धस म्हणाले, 'आमची पहिली पसंती...' (पाहा VIDEO)

BJP MLA Suresh Dhas DCM Ajit Pawar guardian minister Beed district Mahayuti government : बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदावर भाजप आमदार सुरेश धस यांची मोठी प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने राज्य हादरले असतानाच, तिथल्या गुन्हेगारीवरून देखील बीड जिल्हा चर्चेत आला आहे. यातूनच बीडचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी लावून धरली आहे.

परंतु आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव बीडच्या पालकमंत्रीपदासाठी पुढे येत आहे. यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

आमदार सुरेश धस म्हणाले, "अजित पवार (Ajit Pawar) बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यास आमची काहीच हरकत नाही. ते सुतासारखा बीड जिल्हा सरळ करतील. मी अजितदादांच्या हाताखाली, काम केले आहे. ते स्पष्टपणे सांगतात की, हे भंगार आहे, हे करू नका". पण आमची पहिली पसंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारावेच, असे सुरेश धस यांनी म्हटले.

'संतोष देशमुख हत्येतील पसार असलेल्या आरोपींना वाँटेड घोषित केले आहे. यावर सुरेश धस म्हणाले, हे वाँटेड लवकरच पकडले जातील. सुदर्शन घुले याचे कोणाबरोबर फोटो आहे, हे सर्वांना माहीत आहे. विष्णू चाटेला क्राॅस करावं, काहीतरी भयानक करावं, आणि वाल्मिकच्या मनात घर करावं, यातून हे भयानक हत्याकांड घडले असेल. वाल्मिक अण्णा को दिखाना है, हम कितना टेंजर है, एक गँगमध्ये दोन गँग बनवण्याच्या नादात हा झाला, असे सध्या तरी दिसते', असे भाजप (BJP) आमदार धस यांनी म्हटले.

'आका' बाहेर राहतील, असं...

'दोन कोटीमधील दोन महिन्यापूर्वीच 50 लाख दिले होते. दीड कोटींसाठी हे माणसं कोणी पाठवले? 'आका'नीच ही माणसं पाठवली. आकांनीच सांगितलं. त्यांच्या सांगण्यावरून शुक्रवारी लोकं तिथं गेली होती. 'सीडीआर' काढून कोण-कोणाला बोलले, हे कळतं. मला असे वाटतं नाही की, यातून 'आका' बाहेर राहतील म्हणून', असा दावा आमदार धस यांनी व्यक्त केला.

टॉप सिक्रेटवर तपास सुरू...

''आका'ला पकडण्यावर फोकस होता. त्यामुळे इतर लोकं पकडली गेली नाहीत. परंतु 'वाँटेड' लोक देखील लवकर पकडली जातील. टॉप सिक्रेटवर तपास सुरू आहे. आरोपींनाच माहिती होईल, असेही कोणतीही माहिती पोलिसांकडून विरोधक, सत्ताधाऱ्यांना मिळणार नाही, याची काळजी बीडचे पोलिस अधीक्षक घेत आहेत. तसेच वाँटेड आरोपींना पकडण्यासाठी टीम वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत', अशीही माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT