MLA Suresh Dhas News Sarkarnama
मराठवाडा

MLA Suresh Dhas News : एक दाढीने महाभारत, त्यात आता सुरेश धसांच्या वाढत्या दाढीची चर्चा!

The growing beard of BJP MLA Suresh Dhas has sparked discussions in political circles. Explore the reactions and implications in the latest political debate. : कोणी म्हणत अण्णांनी प्रण केला आहे, जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत धस दाढी काढणार नाही? पण याला धस यांचा अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

Jagdish Pansare

Marathwada Political News : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी'या कुणाल कामराच्या विंडबनात्मक गाण्याने धुमाकूळ घातला आहे. शिवसेना पक्षातील बंडावर स्टॅंडअप काॅमेडियन कामरा याने सादर केलेल्या गाण्यानंतर भडकलेल्या शिवसैनिक आणि शिंदे समर्थकांनी कामरा याचा स्टुडिओ फोडत संताप व्यक्त केला. या प्रकरणावरून विधीमंडळाच्या सभागृहात वादळी चर्चा, आरोप-प्रत्यारोप होत असताना आता आणखी एका 'दाढी'ची चर्चा होताना दिसते आहे.

भाजपाचे आमदार आणि गेल्या साडेतीन महिन्यांपासून प्रत्येकाच्या तोंडावर नाव असलेले सुरेश धस यांचा दाढी वाढलेला अवतार सध्या प्रत्येकाच्या उत्सूकतेचा विषय ठरत आहे. एरवी गुळगुळीत चेहऱ्याने वावरणारे सुरेश धस (Suresh Dhas) यांचा वाढलेल्या दाढीचा हा नवा लूक कशासाठी? नेमकं या दाढीमागे दडलंय काय? अशा चर्चांना उधाण आले आहे. काही वर्षांपुर्वी धस यांनी पिळदार मिशा आणि दाढी वाढवली होती. पण बऱ्याच काळानंतर आणि ते ही धस यांची राज्यभरात क्रेझ वाढलेली असताना अचानक त्यांनी दाढी वाढवल्याने तर्क लढवले जात आहेत.

कोणी म्हणत अण्णांनी प्रण केला आहे, जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत धस दाढी काढणार नाही? पण याला धस यांचा अद्याप दुजोरा मिळालेला नाही. (Beed News) एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून राज्याच्या राजकारणात वादंग निर्माण झालेले असताना धसांची दाढी आणखी नवे काय घडवणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले. या प्रकरणात धस यांनी केलेले आरोप, सादर केलेले पुरावे आणि राज्यभरात देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी काढलेले आक्रोश मोर्चे यातून वाढलेल्या दबावातून तपास यंत्रणा आणि सरकारलाही वेगवान कारवाई करणे भाग पडले.

धस यांच्या राजकीय खेळीने संतोष देशमुख यांचे मारेकरी तर गजाआड झालेच, पण बीड जिल्ह्यातील आपल्या राजकीय विरोधकांचाही करेक्ट कार्यक्रम धस यांनी लावला. धनंजय मुंडे यांचे मंत्री पद घालवण्यात धस यांचा सिंहाचा वाटा होता, हे काही लपून राहिलेले नाही. धस यांच्या आक्रमक नेतृत्वामुळेच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या. मकोका अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि दोषारोपपत्रही कमी वेळात दाखल झाले.

दरम्यानच्या काळात राज्याच्या माध्यमांमध्ये सुरेश धस यांचे नाव या ना त्या कारणामुळे झळकतच होते. धनंजय मुंडे यांची त्यांनी घेतलेली गुप्त भेट, सतीश भोसले उर्फ खोक्याला झालेली अटक, त्याच्यावरील गंभीर आरोपाने धस अडचणीत सापडले होते. पण यावर मात करत ते पुन्हा आक्रमक पद्धतीने आपली मोहिम फत्ते करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विधीमंडळाच्या अधिवेशनातही धस यांच्या वाढलेल्या पांढऱ्या दाढीची चर्चा होताना दिसते आहे. या दाढी वाढवण्याचे गुपित धस फोडतात का? हे लवकरच स्पष्ट होईल.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT