Mumbai News : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर भाजप आमदार सुरेश धस चांगलेच आक्रमक आहेत.
आमदार धस यांनी आजही पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप केले. हे आरोप बीड पोलिस दलातील अधिकारी अन् कर्मचाऱ्यांच्या बदल्यांशी निगडीत असल्याने त्यामुळे खळबळ उडाली आहे.
आमदार धस म्हणाले, "बीड पोलिस दल आहे, हे बरचं शिफारशीने भरलं आहे. तत्कालीन 'एक्स' पालकमंत्री, कृषीमंत्री यांनी 'पॉवर ऑफ ॲटर्नी' 'आकां'कडे दिल्याने, बरेच अधिकारी 'आकां'च्या शिफारशीने आले आहेत. बऱ्याच अधिकाऱ्यांना चार्ज देखील 'आकां'च्या शिफारशींवर मिळायचा". त्यामुळे पोलिस (Police) दलाबाबत आता जी ऑर्डर निघाली आहे, त्यातील दोन-चार नावं वगळता, सर्वांची नावे बदलू शकतात. मुख्यमंत्र्यांना विनंती करून, ही नाव बदलणार आहोत, असे आमदार धस यांनी म्हटले.
'बीड (Beed) पोलिस दलात बिंदु नियमावलीप्रमाणे नियुक्ती आहे का? याची चौकशी करण्याची मागणी पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक यांच्याकडे करणार आहे. तशी या दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन, पत्र देखील देणार आहे. बिंदु नियमावलीनुसार नियुक्त्या नसतील, तर त्याची अंमलबजावणी करावी लागेल. मुख्यमत्र्यांकडे देखील याची मागणी करणार आहोत', असेही आमदार सुरेश धस यांनी म्हटले.
बीड जिल्ह्यातील महसूल, पोलिस आदी प्रशासनातील वरिष्ठ समाजाचे लोक आहेत. त्यावर आमदार धस यांनी वरिष्ठ प्रवर्गाचे लोक आहेच. ओपनमध्येच नाही, तर 'अबकड'मध्ये इतर बांधवण्यांच्या जागी, 'माक्रो ओबीसींच्या जागेवर देखील तेच आहेत. 'एससी-एसटी'च्या जागेवर देखील ते आलेले आहेत. यामुळे इनबॅलेन्स झालं आहे. हा इनबॅलेन्स मोडून काढायचा असेल, तर बिंदु नियमावलीची अंमलबजावणी बीड जिल्ह्यात करावीच लागेल. ती कोणीही रोखू शकणार नाही. शिक्षण, एसटी महामंडळात देखील बरचं प्रमाण आहे. भेदाभेद होत आहे, त्याचे प्रमुख कारण देखील हेच आहे. हे नीट-वाकडं करण्याची संधी आली आहे, ते आपण करू या, असेही म्हटले.
"नैतिकतेच्या आधारावर बोलले, तर आमदार प्रकाश सोलंके जे बोलले आहे, त्याला माझे समर्थन आहे. परंतु आजच त्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे, हे मी म्हणणार नाही, असे सांगून माझं मत आहे, त्यांनी काही दिवस, जोपर्यंत संतोष देशमुख हत्याप्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही. गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल होत नाही, तोपर्यंत पदावर राहावं, असं मला वाटत नाही, एकतर त्यांनी बिनखात्याचं मंत्री म्हणून राहावं. किंवा अजित पवारांनी त्यांना थोडसं बाजूला सरकावं, अशी जनतेची भावना आहे", असे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता म्हटले.
संतोष देशमुख हत्येचा निषेध करण्यासाठी उद्या परभणी इथं निघत असलेल्या मोर्चात सहभागी होणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी म्हटले. तसेच पुण्यातील मोर्चात सहभागी होणार. सहा तारखेला राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे छत्रपती संभाजीराजेंबरोबर जाणार आहे. हा जनतेचा आक्रोश आहे, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.