Archana Patil  Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha 2024 : भाजप आमदाराच्या पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश; धाराशिवमध्ये ठाकरेंच्या ओमराजेंविरोधात निवडणूक लढवणार

Political News : दिल्ली दरबारातून या प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थित होते.

Sachin Waghmare

Ncp News : तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगतिसिंह पाटील यांच्या सौभाग्यवती, धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्ली दरबारातून या प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित होते. भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील Rana Jagjitsingh Patil यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी गुरुवारी दुपारी राष्ट्रवादीचा NCP झेंडा हाती घेतला आहे.

या पक्षप्रवेशानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे Sunil Tatakare त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी-भाजप प्रवास

2019 च्या विधानसभा निवडणुकापूर्वी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाले.

याआधी 2004 ते 2008 आणि 2008 ते 2014 या काळात दोन वेळा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महायुतीने प्रतिष्ठेच्या केलेल्या धाराशिव मतदारसंघातील तिढा गुरुवारी सुटला आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ही जागा सुटली असली तरी उमेदवारीबाबतचा सस्पेन्स कायम होता. गेल्या बुधवारीच महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली होती. त्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती.

त्यामुळे त्यांच्या विरोधात कोण रिंगणात उतरणार याचा शोध जवळपास संपला असून, गुरुवारी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने लवकरच त्यांच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, धाराशिव लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात आले होते.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे (Vikram kale) यांचे नाव चर्चेत आले. दोन दिवस ही चर्चा सुरू राहिली आणि त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण (Satish chavan) यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र, आमदार काळे व आमदार चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दर्शवला असल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

R

SCROLL FOR NEXT