Ashok Chavan & Pratap chikhlikar
Ashok Chavan & Pratap chikhlikar  Sarkarnama
मराठवाडा

खासदार चिखलीकरांनी पंढरपुरात येऊन अशोक चव्हाणांवर केली टीका

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत. आतापर्यंत दोन मंत्री तुरुंगात गेले आहेत. आणखी तीन-चार मंत्री लवकरच तुरुंगात दिसतील. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीचे भ्रष्टाचारी सरकार आपोआप घरी जाईल, असे सांगत उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena) ही आता मुस्लिम धार्जिणी सेना झाल्याची टीका भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Prataprao Chikhalikar) यांनी केली. चिखलीकर हे आज (ता.2 मार्च) विठ्ठल रुक्मिणी दर्शऩासाठी पंढरपुरात (Pandharpur) आले होते. दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टिका केली.

चिखलीकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकाने राज्यातील मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे. समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम सरकारने केले आहे. जो पर्यंत अशोक चव्हाण मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावर आहेत. तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. आरक्षण समितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाणांना हटवले पाहिजे. राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकळला आहे. सरकारमधील दोन मंत्री तुरुंगात गेले आहेत. तर आणखी काही मंत्री वाटेवर आहेत. भ्रष्ट्राचारी सरकार लवकरच पाय उतार होईल, असेही चिखलीकरांनी म्हणाले.

छत्रपतींच्या नावाने राज्याचा कारभार चालतो, त्यांच्या वंशजालाच उपोषणाला बसावे लागते ही बाब राज्यासाठी दुर्दैवी आहे. शिवेसेनेने हिंदुत्व सोडले आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. ती मुस्लीम धार्णिजीनी सेना झाल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते चिखलीकर यांचा सत्कार करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT