Bjp Official Join BRS News Sarkarnama
मराठवाडा

BJP Official Join BRS: भाजपच्या माजी आमदाराचे पती बीआरएस पक्षात..

Beed News: भाजपकडून सातत्याने डावलले जात असल्यामुळे त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्याचे बोलले जाते.

सरकारनामा ब्युरो

Marathwada News: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने (BRS)(बीआरएस) आपल्या कक्षा रुंदावण्यास हळूहळू सुरूवात केली आहे. नांदेड मार्गे महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करू पाहणाऱ्या केसीआर यांच्या गळाला मराठवाड्यात चांगला प्रतिसाद मिळतांना दिसतो आहे. भाजपच्या केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांचे पती डाॅ. विजयप्रकाश ठोंबरे यांनी आपल्या समर्थकांसह बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.

हैदराबाद येथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekhar Rao) यांच्या उपस्थितीत सोमवारी हा प्रवेश झाला. (Beed) यावेळी नुकतेच बीआरएसमध्ये दाखल झालेले राष्ट्रवादीचे माजी आमदार व शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे हे देखील उपस्थित होते. २४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या केसीआर यांच्या सभेत ठोंबरे यांचा पुन्हा जाहीर प्रवेश केला जाणार आहे.

यापुर्वी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचेच कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगांवकर यांच्यासह नांदेड, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगरसह विदर्भातील अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी यापुर्वीच बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल विजयप्रकाश ठोंबरे हे लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीचे चेअरमन तसेच कृषी शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या पत्नी संगीता ठोंबरे या २०१४ मध्ये केज मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. २०१९ मध्ये त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली तेव्हापासून दोघे पती-पत्नी राजकारणात सक्रीय नव्हते. भाजपकडून सातत्याने डावलले जात असल्यामुळे त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्याचे बोलले जाते. (Latest Political News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT