<div class="paragraphs"><p>pankaja munde, dhananjay munde&nbsp;</p></div>

pankaja munde, dhananjay munde 

 

sarkarnama

मराठवाडा

पंकजा मुंडे यांची मोठी घोषणा..धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

सरकारनामा ब्युरो

बीड : बीड जिल्ह्यात पाच नगरपंचायतच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे यात प्रचार रंगात आला आहे. सामाजिक न्याय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या प्रचार सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप फैरी झाडल्या जात आहेत. बीडमध्ये नगरपंचायतचे निवडणूक रंगात आली असून राजकीय वातावरण तापले आहे.

''ओबीसी आरक्षणाशिवाय होणारी ही निवडणूक ओबीसीसाठी काळी निवडणूक आहे. ओबीसीचे आरक्षण गमावून महाविकास आघाडीचे नेते भाषण करतात. ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होते.. हे दुर्दैव. महाविकास आघाडी सरकारने 2 वर्षात फक्त तारखा दिल्या, काहीच केलं नाही आणि आता महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात. मराठा समाजाला आरक्षण आणि ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत फेटा आणि हार घालणार नाही,'' असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मुंडे यांनी एक महत्वाची घोषणा यावेळी केली.

नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात मुंडे बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राज्य सरकारवर (Mahavikas Aaghadi Government) टीका केली आहे. मुंडे म्हणाल्या, ''ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन 26 जानेवारीपासून मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे,'' यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांनी ओबीसी आरक्षणा संदर्भात 2 वर्षात एकदाही स्टेटमेंट दिले नाही. त्यानां ओबीसीच देणं घेणं नाही,''

मुंडे म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकार हे तीन पात्याच सरकार आहे. तुम्हाला विरोधी पक्षाची गरज नाही. एक पक्ष एक बोलतो तर दुसरा रस्त्यावर उतरण्याची भाषा बोलतात त्यांना जनता रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात दोन वर्षात जे नारळ फोडले ते देखील मी मंजूर केलेली कामे आहेत. तुमच्याकडे जास्त पैसे झाले असतील तर ओबीसी आरक्षणासाठी पैसे द्या... तुमचं राज्यत काही चालतं? मतदार संघात काही चालत नाही, हे किरायाचं मंत्रीपद आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT