Pankaja Munde News Sarkarnama
मराठवाडा

BJP Political News : पंकजा मुंडे यांच्या शिव `शक्ती` कडे भाजपची पाठ..

Marathwada News : मिळालेल्या माहितीवरून सर्वांना मेसेज दिला होता. काही पदाधिकारी उपस्थित होते, तर लोकप्रतिनिधी शहरात हजर नव्हते.

Jagdish Pansare

Aurangabad Politics : दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा कमबॅक करण्याच्या तयारीत असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde News) यांच्या `शिवशक्ती`, परिक्रमा यात्रेला आजपासून सुरूवात झाली. वेरुळ येथे बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वराचे दर्शन घेत पंकजा यांनी आपल्या यात्रेला सुरूवात केली. पण छत्रपती संभाजीनगरात पंकजा मुंडे यांच्या या शिव `शक्ती`कडे भाजपच्या बड्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.

शहरातील भाजपचे (BJP) मोजके पदाधिकारी पंकजा यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थितीत होते. दुसरीकडे ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी मात्र पंकजा यांच्या परिक्रमा यात्रेला शुभेच्छा देऊन स्वागतासाठी जास्त गर्दी केली होती. (Pankaja Munde) यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या पुर्व मतदारसंघातील गजानन कॉलनीच्या भगवानबाबा मंदिरात शिवसेनेच्या (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी पंकजा यांचे स्वागत केले.

पंकजा मुंडे यांची ही यात्रा आजपासून ११ सप्टेंबर पर्यंत राज्यातील दहा जिल्ह्यात जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथून सोमवारी निघालेल्या यात्रेचा नाशिक येथे समारोप होणार आहे. (Marathwada) गजानन कॉलनी येथील भगवान बाबा मंदिरात दर्शन घेऊन यात्रेला सुरवात झाली. सकाळी पावणेआठ वाजता पंकजा मुंडे यांचे मंदिरात आगमन झाले, मात्र याठिकाणी भाजपचा एकही मोठा नेता, पदाधिकारी उपस्थित नव्हता.

लोकसभेचे प्रभारी समीर राजूरकर, माजी सभापती दिलीप थोरात, सतीश नागरे, गोविंद केंद्रे, बालाजी मुंडे, मनोज भारस्कर अशा मोजक्या पदाधिकाऱ्यांचीच यावेळी उपस्थिती होती. दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे पूर्व विधानसभा मतदार संघाचे राजू वैद्य, शाखाप्रमुख राम केकान यांच्यासह इतरांनी पंकजा मुंडे यांचे स्वागत केले. भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी शिवशक्ती परिक्रमेपासून दूर का राहिले? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी आपण आजारी असल्यामुळे घरीच असल्याचे सांगितले. यात्रेबाबत आम्हाला जास्त कोणी काही सांगितले नाही. तरीही मिळालेल्या माहितीवरून सर्वांना मेसेज दिला होता. काही पदाधिकारी उपस्थित होते, तर लोकप्रतिनिधी शहरात हजर नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT