Chhatrapati SambhajiNagar news : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्वबळावर लढत बहुमताजवळ जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाने काल शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मंत्री अतुल सावे यांनी भाजपच्या सर्व नवनिर्वाचित 57 नगरसेवकांना सोबत घेत शहरातून वाहन रॅली काढली आणि ग्रामदैवत श्री संस्थान गणपती समोर हे सगळे नतमस्तक झाले. भाजपच्या या शक्ती प्रदर्शनानंतर जिल्हा परिषदेत युतीची सत्ता आणण्यासाठी संस्था गणपतीला साकडे घालण्यात आले.
महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती न करता भाजपने स्वबळावर 57 नगरसेवक निवडून आणत शहराच्या राजकारणात नवा इतिहास रचला. शिवसेनेचे बोट धरून वाढलेल्या भाजपने आता शिवसेनेलाच मागे टाकले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मिळून केवळ 19 जागा निवडून आल्या या सत्तेत असलेल्या शिवसेनेला 13 जागांवर विजय मिळवता आला.
खऱ्या अर्थाने ही शिवसेनेची पीछेहाटच म्हणावी लागेल. महापालिकेत बहुमताजवळ गेलेल्या भाजपने जिल्हा परिषदेसाठी मात्र युती करत सामंजस्याची भूमिका घेतल्याची दिसून आले. जिल्हा परिषदेत आता सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील 11 गट सोडून शिवसेना भाजपची युती झाली आहे.
काल युतीची अधिकृत घोषणा केल्यानंतर ओबीसी मंत्री अतुल जावे यांनी भाजपच्या विभागीय कार्यालयापासून सर्व 57 नवनिर्वाचित नगरसेवकांना सोबत घेत वाहन रॅली काढली गळ्यात भगवे उपरणे आणि डोक्यावर फेटा अशा रुबाबात भाजपचे हे सगळे नगरसेवक आणि कार्यकर्ते रात्री संस्थान गणपती येथे पोहोचले त्यानंतर महाआरतीने या वाहन रॅलीचा समारोप झाला.
शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणतेही कार्य आरंभताना श्री संस्थान गणपती चरणी नतमस्तक होण्याची परंपरा आम्ही कायम जपली आहे आणि प्रत्येक वेळी त्यास यशाची जोड मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने भाजपावर विश्वास ठेवत 57 नगरसेवक निवडून दिले. या ऐतिहासिक विजयाने महानगराच्या विकासाला नवा वेग मिळणार आहे. शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गणरायाच्या चरणी एकजुटीने साकडे घालून उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आल्याचे अतुल सावे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.