Aurangabad Loksabha News  Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad Loksabha News : कराडांना इच्छा व्यक्त करायला लावून भाजपची लोकसभेसाठी तयारी..

BJP Political News : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील कराडांना बळ दिल्याचे दिसून आले आहे.

सरकारनामा ब्युरो

Marathwada Political News : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजप लढणार की शिंदे गट? यावरून आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. (Aurangabad Loksabha Constituency) केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदाच जाहीरपणे आपण लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी मात्र ही जागा शिवसेनेची आहे आणि ती आम्हीच लढवणार असे सांगत कराडांनी जास्त घाई करू नये, असा सल्ला दिला.

लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने आता शिल्लक राहिले आहेत. (Aurangabad) राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठे त्रांगडे निर्माण झाले आहे. राज्यात सध्या शिंदे- फडणवीस आणि पवार यांचे ट्रिपल इंजिन सरकार सत्तेवर आहे. (BJP) संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर गेल्या २५-३० वर्षापासून इथे शिवसेना- भाजपची युती कायम होती.

युतीमध्ये हा मतदारसंघ सातत्याने शिवसेनेकडे होता. आता शिवसेनेत फूट पडल्यामुळे शिंदे आणि ठाकरे यांची शिवसेना असे दोन उमेदवार रिंगणात राहण्याची शक्यता आहे. (Dr.Bhagwat Karad) परंतु शिवसेना फुटल्यानंतर या पक्षाची आता ताकद कमी झाली आहे, असा दावा करत भाजपने मराठवाड्यातील एक दोन नव्हे तर तीन लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. शिंदे गटाकडून अद्याप तरी या विषयावर भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदारांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र आता निवडणूक दहा महिन्यांवर आलेली असताना शिंदे गट लोकसभे संदर्भात काहीच भूमिका घेत नसल्यामुळे विद्यमान खासदारांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे. इकडे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात डॉ. कराड यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. कराड यांनी इच्छा व्यक्त केली त्यात गैर काय? असे म्हणत मराठवाड्यातील दुसरे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील कराडांना बळ दिल्याचे दिसून आले आहे. संजय शिरसाट यांनी जरी या विषयावर थोडक्यात भूमिका मांडली असली तरी राज्य पातळीवर काय निर्णय होतात? यावरच संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात कोण लढणार हे स्पष्ट होणार आहे.

कराडांची तयारी पाहता भाजप श्रेष्ठींनीच त्यांना इच्छा जाहीर करण्यास सांगितल्याची देखील चर्चा आहे. यामुळे कराडांनी जोरदार तयारी सुरू केल्याचे बोलले जाते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजप- ठाकरे गट- एमआयएम अशी तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. कराड यांच्यामुळे भाजपने ही जागा लढवली तर तेच उमेदवार असतील हे स्पष्टच आहे. पण शिंदे गटाचा दावा मान्य झाला तर संदीपान भुमरे- संजय शिरसाट यांच्यापैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते. सत्तार यांचे नाव चर्चेत असले तरी ते लोकसभा लढवण्याची शक्यता कमीच आहे. येत्या महिनाभरात या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT