Radhakrishna Vikhe Reacts Sarkarnama
मराठवाडा

Radhakrishna Vikhe On Rohit Pawar : अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांची तिसरी प्रेस; मुंबईतून मोठा 'शंका बॉम्ब'! मंत्री विखे म्हणाले, “भानगडी बंद करा!”

Radhakrishna Vikhe Reacts to Rohit Pawar Over Ajit Pawar Crash Doubts : अजित पवार यांच्या विमान अपघातांवर वारंवार पत्रकार परिषद घेणाऱ्या रोहित पवार यांच्या भूमिकेवर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

Radhakrishna Vikhe reaction : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात त्यांच पुतणे आमदार रोहित पवार यांनी आज तिसरी पत्रकार परिषद मुंबईत घेतली. रोहित पवार यांनी विमान अपघातासंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित करत, अनेक शंकांना जन्म घातला. याची उत्तरे विमान अपघातांची चौकशी करणाऱ्या एजन्सी आणि सरकारकडून त्यांना अपेक्षित आहेत.

रोहित पवार यांच्या वारंवार होत असलेल्या पत्रकार परिषदेवर आणि त्यातून उपस्थित होणाऱ्या शंकांवर, भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तिखट शब्दात कानटोचणी केली आहे. मंत्री विखे पाटील यांच्या या तिखट कानटोचणीवर रोहित पवार देखील पलटवार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) म्हणाले, "कोण काय म्हणतं, त्याला फार महत्त्व देऊ नये. हा सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे. आपली स्वतःची पोळी भाजण्याचा हा प्रकार आहे. रोहित पवारांना एक विनंती आहे, हे आरोप करणं, या भानगडी, हे धंदे बंद करावेत. कुटुंबावर मोठा आघात झालेला आहे. चौकशी अंती सर्व काही पुढे येईल."

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे विमान अपघातात निधन झाले. 28 जानेवारीला बारामती विमान तळावर विमानाचा अपघात झाला आणि अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांना मृत्यू झाला. या मृत्यूनंतर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना विमान अपघात संशय व्यक्त केला.

दरम्यान, मंगळवारी (ता.17) विमान अपघात प्रकरणात ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती समोर आली. ज्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत, गंभीर प्रश्न उपस्थित केले. यात रोहित पवारांनी भाजपच्या दिशेने संशय व्यक्त करणाऱ्या शंकेवरून राज्यातील राजकारणात धुरळा उडू लागला आहे.

भाजपचा कट्टर समर्थक ट्रोल करणारा, समित ठक्कर नावाच्या व्यक्तीचे नाव घेत रोहित पवार यांनी मोठा आरोप केला. अजितदांदाच्या विमान अपघाताच्या दोन दिवस आधी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचे समित ठक्करने ट्विट केले आणि ते अवघ्या सात मिनिटांत डिलिट केले. आता तोच मला ट्रोल करत आहे. हा भाजपचा समर्थक ट्रोलर असून, त्याला आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घ्यावे, असे म्हणत शंकांचे वादळ उठवून दिले आहे.

यातच भाजप मंत्री विखे पाटील यांनी रोहित पवार यांची, अजितदादांच्या विमान अपघातांवर वारंवार घेत असलेल्या पत्रकार परिषदेवरून तिखट शब्दात सुनावल्याने, यावरून पुढे राजकीय वातावरण अधिकच तापणार असल्याची चिन्हं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT