Central State Railway Minister Raosaheb Danve News
Central State Railway Minister Raosaheb Danve News Sarkarnama
मराठवाडा

Bjp : रावसाहेब दानवे म्हणतात लोकसभेसाठी मिशन ४५ नाही ४८..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मिशन ४५ चे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवून रणनिती आखायला सुरूवात केली आहे. केंद्रातील मंत्री आणि बड्या नेत्यांना याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन बारामतीत याच पार्श्वभूमीवर येणार आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर देखील बिहार, झारखंड राज्यातील काही लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.

या संदर्भात दिल्ली (Dehli) येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना दानवे यांनी मात्र मोठा दावा केला आहे. भाजपचे मिशन ४५ नाही तर ४८ आहे, तीन जागा कोणत्या सोडता, असे म्हणत आमचे लक्ष्य महाराष्ट्रातील ४८ जागांवर असल्याचे स्पष्ट केले आहे. (Bjp) दानवे म्हणाले, मागची निवडणुक संपली की आम्ही पुढच्या निवडणुकीची तयारी करत असतो, त्यामुळे आमचे मिशन राज्यातील सर्व ४८ जागा असणार आहे.

बारामतीमध्ये सितारामन यांचा दौरा हा पक्षाच्या नियोजनाचा भाग आहे, पण राष्ट्रवादी काॅंग्रेस हे आमच्या समोरचे चॅलेंज नाही. युतीत असतांना सहा आणि स्वतंत्र लढल्यानंतर चार जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीचे आव्हान आम्ही मानतच नाही. नेत्यांना प्रोत्साहन देणे, केंद्राच्या योजना लोकांना समजावून सांगणे या नित्यक्रमाचा भाग म्हणून निर्मला सितारामन बारामतीला जाणार आहेत, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

मैत्री दिनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे, अशी अपेक्षा काही आमदारांनी व्यक्त केली आहे, यावर तुम्हाला काय वाटते असे विचारले असता, दानवे म्हणाले, राजकारणात कायम कोणी कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो. गेली २५ वर्ष आम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र काम करत होतो, पण आता त्यांना आमच्याबरोबर राहिल्यामुळे नुकसान झाले असे वाटू लागले आणि त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवले.

आता आम्ही शिंदे यांच्या रुपाने नवा मित्र शोधला आहे. उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबत यावं म्हणून काही आम्ही त्या दारात आता जाणार नाही. त्यांना यायचं असेल, मागचा पश्चाताप झाला असेल तर त्यांनी यावं आमचा नकार नाही, पण आमच्या नव्या मित्राला आणि सरकारला डिस्टर्ब करू नये, असा टोला देखील दानवे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT