K.Chandrakshekhar Rao : तेलंगणा राज्यात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या साडेचारशेहून अधिक कल्याणकारी योजना घेवून आम्ही महाराष्ट्रात (Maharashtra) आलो आहोत. शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा मिळावा हाच आमचा हेतू आहे. आमचा पक्ष राजकीय असल्यामुळे महाराष्ट्रात राजकारण करायलाच येत आहोत, सर्कशीसाठी नाही, अशा शब्दात निजामाबादचे आमदार व बीआरएस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी अशान्नगारी रेड्डी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
शिवसेना-भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात असून ते पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा देखील रेड्डी यांनी केला. के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekhar Rao) यांनी २४ एप्रिल रोजी शहरातील जांबिदा मैदानावर जाहीर सभा होणार आहे. (Marathwada) या सभेच्या पुर्वतयारीसाठी तेलंगणातून भारत राष्ट्र समिती (बीआरएस) ची एक टीम आठवडाभरापासून शहरात ठाण मांडून आहे. महाराष्ट्र प्रभारी अशान्नगारी जीवन रेड्डी यांनी आज पत्रकार परिषद घेत या सभे संदर्भात माहिती दिली.
रेड्डी म्हणाले, मराठवाड्यात आमच्या पक्षाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षात झाले नसतील एवढे प्रवेश २४ तारखेच्या सभेत होणार आहे. (Maharashtra) सत्ताधारी पक्षाचे काही आमदार देखील आमच्या संपर्कात असून त्यांच्यासह पन्नास नगरसेवक असे तीनशेहून अधिक जणांचा पक्षप्रवेश या सभेच्या माध्यमातून होणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती काहीही असली तरी लोकांना तेलंगणा माॅडलेबद्दल आकर्षण आहे.
`अब की बार किसान सरकार`, हा आमचा नारा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताला आमचे प्राधान्य असणार आहे. तेलंगणात जे जे आम्ही शेतकऱ्यांसाठी करतो आहोत, ते आम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी करायचे आहे. शेवटी आमचा एक राजकीय राष्ट्रीय पक्ष आहे, राजकारण करत असतांना ते विकासाचे असले पाहिजे, ही आमच्या मुख्यमंत्र्यांची धारणा आहे.
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आम्ही जे तेलंगणात करतो आहोत, ते केलं असतं तर आम्हाला इथे यावे लागले नसते, असेही अशान्नगारी जीवनरेड्डी यांनी सांगितले. कोण कोण तुमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत? असे विचारले असता सगळेच आता जाहीर कसे करता येईल, तुम्ही २४ तारखेच्या सभेत पहा, असे आवाहन देखील त्यांनी पत्रकारांना केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.