मुंबई : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी देऊ नका, असा कोणताही प्रस्ताव भारतीय जनता पक्षाने (BJP) महाविकास आघाडीला दिलेला नाही. कारण, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मी बुधवारी (ता. १५ जून) एकत्र होतो. आमची या विषयावर चर्चाही झाली. मात्र, खडसेंना उमेदवारी देऊ नका, असा कोणताही प्रस्ताव आम्ही दिलेला नाही, असा खुलासा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (mp imtiaz Jalil) यांच्या दाव्यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला. (BJP was going to hold the Legislative Council elections unopposed on this condition)
एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली नसती तर भाजप विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करायला तयार होती, असा दावा एमआयएमचे खासदार जलील यांनी केला होता. त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर दानवे बोलत होते.
दानवे म्हणाले की, आमचा असा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीकडे गेलेला नाही. देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये याबाबत चर्चा झाली. खडसेंना उमेदवारी देऊ नका, असे आम्ही कधीही म्हटलेले नाही. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो विषय आहे, आम्ही कोणाचं नाव का बरं सुचवावं, असा प्रश्न दानवे यांनी केला.
एकनाथ खडसे यांना पराभूत करण्यासाठी भारतीय पक्षाने प्लॅनिंग आहे, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यावर बोलताना दानवे म्हणाले की, आम्ही एकनाथ खडसे यांनाच नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांना हरवणार आहेात, आम्ही कोणत्याही व्यक्तीला हरवण्यासाठी निवडणूक लढवत नाही.
एम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना नवीन पक्ष काढण्याबाबत दिलेल्या सल्ल्यावरही रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले की, राजकारणात दुसऱ्यांमध्ये कसा खोडा घालता येईल, असे प्रत्येकजण पाहत असतो. जलील म्हटल्यावर पंकजा मुंडे त्यांना प्रतिसाद देतील, असे काही नाही. त्या पक्षाच्या प्रमुख नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे संस्थापक सदस्य होते. त्यामुळे असं कोणाच्याही बोलण्यावर त्या निर्णय घेतील, असं मला वाटत नाही. पंकजा मुंडे या राष्ट्रीय चिटणीस आहेत. पक्ष योग्य त्या ठिकाणी त्यांचा विचार करेल, अशी मला खात्री आहे, असे राज्यसभा व विधान परिषद या दोन्ही ठिकाणी त्यांचा विचार न झाल्याने त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला, या प्रश्नावर दानवे यांनी उत्तर दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.