Dhas-Dhonde Sarkarnama
मराठवाडा

बीड जिल्ह्यात नगर पंचायतीत ताकद असलेल्या भाजपला गटबाजीची बाधा

पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आष्टी/पाटोदा/शिरुर मतदार संघातील या तीनही नगर पंचायती राष्ट्रवादीने जिंकंल्या होत्या. (Beed District)

Dattatrya Deshmukh

बीड : जिल्ह्यात होत असलेल्या पाच नगर पंचातींपैकी चार नगर पंचायतींवर आज भाजपची सत्ता आहे. मात्र, होत असलेल्या निवडणुकीत भाजपमध्ये गटबाजीचे चित्र आहे. त्याचा निकालावर परिणाम होईलच का, हे आताच सांगणे कठीण आहे. जिल्ह्यात केज, वडवणी, आष्टी, पाटोदा व शिरुर कासार या पाच नगर पंचायतींच्या निवडणुका आहेत.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आष्टी/पाटोदा/शिरुर मतदार संघातील या तीनही नगर पंचायती राष्ट्रवादीने जिंकंल्या होत्या. त्यावेळी सुरेश धस राष्ट्रवादीत होते. तर भाजपचे नेतृत्व तत्कालिन भाजप आमदार भिमराव धोंडे यांनी केले होते. पुढे सुरेश धस भाजपात गेले आणि या नगर पंचायतींवरील राष्ट्रवादीचे झेंडे निघून भाजपचे फडकले.

तर, तेव्हा केजमध्ये कॉंग्रेस आणि वडवणीत भाजपने विजय मिळविला होता. त्यामुळे सध्या नगर पंचायतींवर प्रशासकांच्या नेमणूका असल्या तरी तत्पूर्वी पाच पैकी चार नगर पंचायती भाजपच्या ताब्यात होत्या. प्रमुख राष्ट्रवादीकडे एकही नगर पंचायत नव्हती.

दरम्यान, आता होणाऱ्या निवडणुकीत आष्टी, पाटोदा व शिरुर कासार नगर पंचायतींमध्ये भाजपच्या आमदार सुरेश धस व माजी आमदार भिमराव धोंडे यांच्यातील राजकीय गटबाजी अद्याप संपली नसल्याने चित्र आहे. सद्यस्थितील श्रेष्ठींना धस - धोंडे मनोमिलन करण्यात यश आलेले नाही.

एबी फॉर्म देखील सुरेश धस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे आता पेच निर्माण होणार आहे. या मतदार संघात बाळासाहेब आजबे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आता भाजपला राष्ट्रवादीशी लढतानाच अंतर्गत गटबाजीवरही ईलाज शोधावा लागणार आहे. मात्र, गटबाजीचा परिणाम निकालावर होणार का, हे आताच सांगणे कठीण आहे.

तर, इकडे केजमध्ये भाजपच्या नमिता मुंदडा असल्या तरी केज नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर भाजपध्ये काहीसे सामसुम असेच चित्र आहे. या ठिकाणी पक्षाचा मतदार असला तरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांची नाळ स्थानिक पातळीवर फारशी जोडली गेलेली नाही. वडवणी नगर पंचायतीमध्ये भाजपची सत्ता आहे.

मात्र, आता भाजपचे माजी आमदार केशव आंधळे आणि जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्यातच गटबाजी आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही जोर लावला आहे. आता गटबाजीनंतरही भाजप बाजी मारणार का, हे पहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT