Abdul Sattar latest news in Marathi, Jalna News in Marathi
Abdul Sattar latest news in Marathi, Jalna News in Marathi Facebook/@Abdul Sattar
मराठवाडा

'याचा हिशोब भाजपला 2024 मध्ये द्यावा लागेल'; अब्दुल सत्तारांचा थेट इशारा

सरकारनामा ब्युरो

जालना : ''भाजपकडून अनेकदा अर्जुन खोतकरांचं राजकीय अस्तित्त्व मिटवण्याचे प्रयत्न करण्यात आले, ते पूर्णपणे बाहेर आले. पण 2024 मध्ये त्यांना याचा हिशोब द्यावा लागेल, असा इशारा ग्रामविकास व महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी भाजपला दिला आहे. जालन्यात आयोजित शेतकरी मेळाव्यात मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप (bjp) नेत्यांवर जोरदार टीका केली. (Abdul Sattar latest news in Marathi)

या प्रसंगी जालना कृषि उत्त्पन्न बाजार समितीच्या 13 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि अब्दुल सत्तार यांनी या विकासकामांचे भूमिपूजन केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर होते. विकास कामांच्या उदघाटनानिमित्ताने बाजार समितीच्या आवारात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

राज्यात सध्या हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावरुन राजकारण शिगेला पोहचलं आहे. विरोधी पक्षनेते हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीला घेरण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. या मुद्द्यावरुन अब्दुल सत्तार यांनी भाजपच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. हे चार आणे, राणे फाणे यांनी अजून पूर्णपणे शिवसेना बघितली नाही, असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. तर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे रावसाहेब हे दानवे नाही तर दानव आहेत,अशी टीका सत्तार यांनी केली.

राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणाद्वारे कारवाया केल्या जात आहेत. त्यात आतापर्यंत महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांना तुरुंगात जावं लागलं. तर अजूनही अनेक नेत्यांवर ईडी, सीबीआय कडून धाडसत्र सुरुच आहे. या धाडी केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यानंतर पडल्याचा आरोप महाविकास आघाडीतून करण्यात येत आहे. पण जर यंत्रणांनी भाजप नेत्यांवर धाडी टाकल्या तर केंद्र सरकारला नवीन तुरुंगच उभारावं लागेल, असा सणसणीत टोला सत्तार यांनी भाजपला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT