Bjp Meeting In Latur
Bjp Meeting In Latur Sarkarnama
मराठवाडा

Latur : जिल्हा परिषदेत भाजपचा ५१ प्लसचा नारा ; सर्व निवडणूका ताकदीने लढू आणि जिंकू..

सरकारनामा ब्युरो

लातूर : येणा-या काळात होवू घातलेल्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या निवडणूका कार्यकर्त्‍याच्‍या असून ज्‍या कार्यकर्त्‍याच्‍या मेहनतीवर यशाची अनेक शिखरे आपण गाठली. (Latur) पक्षाचा विचार, ध्‍येयधोरण तळागाळातील सर्वसामान्‍यासह मतदारापर्यंत पोंहचविणा-या कार्यकर्त्‍यासाठी भारतीय जनता पार्टी (Bjp) जिल्‍हा परिषद, पंचायत समितीसह सर्व निवडणूका ताकतीने लढणार असल्याचा निर्धार भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्‍याच्‍या बैठकीत करण्‍यात आला.

बैठकीला आमदार तथा जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड, संभाजी पाटील निलंगेकर, (Sambhaji Patil Nilangekar) माजी कृषी राज्‍यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार अभिमन्‍यू पवार, विनायकराव पाटील, अरविंद पाटील निलंगेकर, सुधाकर भालेराव, गणेश हाके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थिती होते. (Marathwada)

जिल्‍हयात आजही गाळपाअभावी ऊस मोठया प्रमाणात उभा आहे यासह सोयाबीनच्‍या बियाणाचा काळा बाजार होणार नाही यासाठी कार्यकर्त्‍यांनी पक्षाच्‍या आदेशाची वाट न पाहता जनतेच्‍या प्रश्‍नासाठी रस्‍त्‍यावर उतरले पाहीजे, असे आवाहन निलंगकेर यांनी केले. ते म्हणाले, जिल्‍हयातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या निवडणूका सोप्‍या आहेत. जो जमीनीशी जोडला जातो तोच मजबूत राहतो, पैशाने जोडलेला पालकमंत्री मजबूत राहू शकत नाही.

गेल्‍या अडीच वर्षात कोरोनासह वेळोवेळी आलेल्‍या संकटात पालकमंत्री जनतेत आले नाहीत. मात्र प्रत्‍येकवेळी भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांनी अडचणीत, संकटात सापडलेल्‍यांना वेळोवेळी मदत केली आहे. येणारी जिल्‍हा परिषद ही कोणत्‍याही परिस्थितीत भाजपाचीच असेल, असा दावा देखील त्यांनी केला.

रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले, ओबीसी आणि मराठा दोन्‍ही आरक्षण घालवण्‍याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले असून गेल्‍या पाच वर्षात लातूर जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातून विकासाची अनेक कामे झाली. कार्यकर्त्‍यांच्‍या मेहनतीने पक्षाची ताकद जिल्‍हाभरात उभी झाली. पक्षाचा विचार गावागावात पोंहचविणा-या कार्यकर्त्‍याला न्‍याय देण्‍यासाठी जीवाचे रान करू. निवडणूका कधीही होतील कार्यकर्त्‍यांनी आजपासूनच कमळ हेच उमेदवार समजून कामाला लागावे.

जनता आघाडी सरकारला वैतागली

जिल्‍हा परिषदेत ५१ प्‍लस हा भाजपाचा संकल्‍प असून ज्‍या विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक सदस्‍य निवडून येतील त्‍या मतदार संघाला जिल्‍हा परिषद अध्‍यक्षाचा मान मिळेल असेही कराड यांनी स्पष्ट केले. शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्‍यापारी, विद्यार्थी यांच्‍यासह सर्व सामान्‍य जनता महाविकास आघाडी सरकारवर वैतागली आहे.

अतिरिक्‍त ऊस, शेतकरी आत्‍महत्‍या, विज टंचाई, आरक्षण आदि प्रश्‍न राज्‍यात गंभीर बनले असून राज्‍य सरकार याकडे जाणीवपुर्वक डोळेझाक करीत असल्‍याचा आरोप माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. तर खा. सुधाकर शृंगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वातील केंद्र शासनाने राबविलेल्‍या विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोंहचवाव्‍यात असे आवाहन केले. येणा-या निवडणूकीत पक्ष जो आदेश देईल त्‍यानुसार काम करून कार्यकर्त्‍यांना मान सन्‍मान मिळवून देवू असे आमदार अभिमन्‍यू पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT