jalna News: जालना जिल्ह्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची मागणी डावलली जात असल्याचे पडसाद अधिवेशनातही उमटल्याचे पाहायला मिळाले. माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यात विधामंडळातच खडाजंगी झाली. गेल्या सहा वर्षापासून मागणी होत असतानाही ही मागणी डावलली जात असल्याने जालन्यात राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जालना जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नावरून अधिवेशनात माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्ह्यातील आरोग्य सेवेचे वाभाडे काढले. गेल्या सहा वर्षापासून जालन्यातील परतुर आणि मंठा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाची मागणी होत असताना ती डावलली जात असल्याचा आरोप लोणीकर यांनी केला.
त्याचवेळी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घनसावंगी तालुक्यात अंबडसह दोन उपजिल्हा रुग्णालये मंजूर करून घेतली. लोणीकर म्हणाले, जालना जिल्ह्यात अंबड शहर वगळता जिल्ह्यात दुसरीकडे कुठेच उपजिल्हा रुग्णालये नाहीत. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थाही मोडकळीस आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात गंभीर अवस्थेतील रूग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयांमध्ये पाठवले जाते. भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूरचे अत्यवस्थ रूग्ण छत्रपती संभाजीनगरला आणि परतूर मंठा तालुक्यातील अत्यवस्थ रूग्ण परभणीला उपचारासाठी पाठवले जातात, अशी परिस्थिती मांडत लोणीकरांनीतानाजी सावंतांना धारेवर धरले.
त्याशिवाय जालना जिल्ह्यातील कोविड रुग्णालयासाठी दहा कोटी रुपयाचा सीएसआर अंतर्गत निधी मंजूर झाला होता. त्यांतर्गत जालना जिल्हा रुग्णालयासाठी उपकरणे व साहित्य खरेदी केले होते. त्या खरेदीची चौकशी करण्याची मागणी विधानसभेत केली. याची दखल घेत आरोग्य मंत्री सावंत यांनी जालना जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकाच्या कारभाराची चौकशी करण्याची आदेश दिले आहेत. मंत्री राजेश टोपे यांनी अंबडसह दोन उपजिल्हा रुग्णालये त्यांनी घनसावंगी तालुक्यात मंजूर करून घेतले.या बद्दल टोपे यांच्या कौशल्याचे कौतुक करीत विधानसभेत लोणीकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.