BJP Political News Sarkarnama
मराठवाडा

Parbhani BJP Politics : ठाकरे गटापासून दुरावलेल्या ब्राह्मण मतदारांवर भाजपचा डोळा...

Prasad Shivaji Joshi

Marathwada Political News : शिवसेना व भारतीय जनता पक्षाची पारंपरिक व्हाेट बँक असलेल्या ब्राह्मण समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. (BJP News) रविवार, दि. १ रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि परभणी येथे भाजपने ब्राह्मण समाजासोबत संवाद बैठका आयोजित केल्या होत्या.

छत्रपती संभाजीनगर येथील बैठक राज्य मंत्रिमंडळातील मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पार पडली, तर परभणीत जिंतूर विधानसभेच्या आमदार मेघन बोर्डीकर (Meghana Bordikar) यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले. (Shivsena) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्वाचे विचार व मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा ऐतिहासिक निर्णय यामुळे ब्राह्मण समाज हा कायमच शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला.

मात्र, शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे हिंदुत्वाविषयी भूमिका मांडताना सातत्याने शेंडी जाणव्यावर टीका करतात. (BJP) आमचे हिंदुत्व शेंडी जाणव्याचे नाही, असे वारंवार जाहीरपणे सांगतात. राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी अलीकडेच ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता.

यामुळे शिवसेनेशी जोडलेल्या पारंपरिक ब्राह्मण मतदारात ठाकरे गटाविषयी नाराजीची भावना व्यक्त होऊ लागली. शिवसेना ठाकरे गटापासून तुटलेला हा मतदार भाजपकडे वळविण्यासाठी पक्षाने प्रयत्न सुरू केले आहेत. छत्रपती संभाजीनगर व परभणी येथे झालेल्या बैठका हा त्याचाच एक भाग असल्याचे मानले जाते. कारण शहरी भागात ब्राह्मण समाजाची मते निर्णायक आहेत.

एकगठ्ठा मते मिळत नसल्याने ब्राह्मण समाजाला निवडणुकीच्या राजकारणात नेहमीच दुय्यम स्थान मिळत असल्याची भावना मतदारात दिसून येते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आजपर्यंत दलित मुस्लिम व्हाेट बँक सांभाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. या प्रयत्नातून अनेकदा दुखावल्यालेल्या ब्राह्मण मतदारांनी समाजमाध्यमांमध्ये प्रतिक्रियाही व्यक्त केल्या.

त्यामुळे हा समाज कायमच शिवसेना व भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार बनला. मात्र, यामुळे अनेकदा ब्राह्मण समाजाला गृहीत धरले जात असल्याची भावना ब्राह्मण संघटनांनी बोलून दाखवली. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पारंपरिक मतदाराला आपलेसे करण्यासाठी संवाद बैठकांचे आयोजन केले आहे.

यानिमित्ताने ब्राह्मण समाजातील युवकांना स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध व्हावी, यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. ब्राह्मण समाजाने विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे १० ऑक्टोबर रोजी मोर्चाचे आयोजन केले असून, यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी संघटनांनी केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT