Harshvardhan Jadhav News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Harshvardhan Jadhav : मोर्चा काढण्यापेक्षा तिजोरीच्या चाव्या फिरवा, नुकसान भरपाईचे पैसे द्या..

Kannad : आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी हर्षवर्धन व संजना हे दोघेही तयारी लागले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या मंगळवारी (ता.२१) कन्नड तहसिल कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. शेतकरी, संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रश्नांसाठी हा मोर्चा असणार आहे. या निमित्ताने कन्नड तालुक्यात राजकारण रंगले आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी या मोर्चावरून भाजप व संजना जाधव यांना सल्ला दिला आहे.

केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार आहे, त्या सरकारच्या तिजोरीच्या चाव्या तुमच्या ताब्यात आहेत. तेव्हा फक्त त्या चाव्या फिरवा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे द्या. (Raosaheb Danve) रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यासाठी एक कार्यक्रम कन्नडमध्ये घ्यावा, मोर्चा काढण्यापेक्षा त्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसान भरपाईचे पैसे दिले तर जास्त आनंद वाटेल, असा टोला देखील हर्षवर्धन यांनी लगावला आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे खात्यावर जमा करावे, शेतकऱ्यांचे वीजबिल सरसकट माफ करावे, उर्वरित गावांचा पोखरा योजनेत समावेश करावा, पी.एम. सन्मान निधीचा लाभ मिळावा, 2021-22 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 15 कोल्हापुरी बंधारे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तरी त्यांची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, आदी मागण्यासाठी संजना जाधव या मंगळवारी मोर्चा काढणा आहेत.

ग्रामीण भागातील रस्ते, बचत गटांना कर्जपुरवठा करण्यात यावा, कापूस, ऊस, मका, सोयाबीन पिकांना योग्य भाव मिळावा या मागण्यांसाठी देखील हा मोर्चा पिशोर नाक्यापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. तत्पुर्वीच हर्षवर्धन जाधव यांनी या मोर्चावर टीकास्त्र सोडले. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी हर्षवर्धन व संजना हे दोघेही तयारी लागले आहेत. त्यामुळे आगामी काळात तालुक्यात या दोघांमधील कुरघोडीचे राजकारण पहायला मिळणार एवढे मात्र निश्चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT