Marathwada : लासूर स्टेशन येथे सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामामुळे लोकांच्या मालमत्ता बाधित होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. (BRS-BJP News) ही ड्रेनेज लाईन ५० ऐवजी ३५ फूटांवरूनच टाकण्यात येत असल्यामुळे काही नागरिकांना आक्षेप घेतला. याची माहिती मिळताच बीआरएसचे संतोष माने आपल्या कार्यकर्त्यांसह काम सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेतली.
चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचा आक्षेप घेत त्यांनीही काम बंद करण्याच्या मागणी केली. यावरून तिथे उपस्थितीत आमदार प्रशांत बंब (Prashant Bumb) यांचे कार्यकर्ते आणि माने व त्यांच्या समर्थकांमध्ये आधी वादावादी झाली. वाद विकापोला गेल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने मोठा गोंधळ उडाला. (BJP) पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
संतोष माने यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून बंब यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. (Marathwada) प्रशांत बंब यांच्याकडून मतदारसंघात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामासह इतर अन्य कामातील अनियमितता, गुणवत्ता यावर माने यांनी आक्षेप घेतलेला आहे. आज लासूरमध्ये जेव्हा ड्रेनेज लाईनच्या चुकीच्या कामामुळे नागरिकांचे नुकसान होत आहे, याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आम्ही वाद घालायला नाही, तर सामंजस्याने चर्चा करून मार्ग काढण्यासाठी गेलो होतो. यावेळी ज्या रहिवांशाच्या मालमत्ता ड्रेनेज लाईनच्या चुकीच्या कामामुळे बाधित होत होत्या, ते सहाजिकच आक्रमक झाले होते. आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतांना समोरच्या बाजूने अरेरावीची भाषा करण्यात आली. ते आमच्या अंगावर धावून आल्याचे संतोष माने यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.