BRS - K Chandrashekhar Rao Sarkarnama
मराठवाडा

BRS Entry in Maharashtra Politics : मोठी बातमी : BRS ने महाराष्ट्रात खातं उघडलं ; मराठवाड्यात..

BRS opens Sarpanchpad account in Maharashtra : सावखेडा गावावर झेंडा फडकावला

सरकारनामा ब्यूरो

Sambhajinagar News : भारत राष्ट्र समितीचे 'तेलगंणा पॅटर्न'आता महाराष्ट्रात राबवून सत्ता आणण्यासाठी बीआरएस पक्षाचे अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekhar rao) यांनी कंबर कसली आहे. (BRS opens Sarpanchpad account in Maharashtra)

महाराष्ट्रात प्रथम सरपंच निवडून येऊन भारत राष्ट्र समिती पक्षाची गंगापूर खुलताबाद विधानसभेमध्ये दमदार एन्ट्री झाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात आता तेलंगणातील भारत राष्ट्र समितीने (BRS) पाय रोवण्यास सुरवात केली आहे. राज्यभर भारत राष्ट्र समितीचे बँनर झळकू लागले आहेत.

आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकी महाराष्ट्रात उतरण्याची बीआरएसची (BRS) तयारी सुरु असताना बीआरएसने आता महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील सावखेडा गावावर (ता.गंगापूर) बीआरएसने झेंडा फडकावला आहे.

सावखेडाग्रामपंचायतीवर बीआरएसचा पहिला सरपंच बिनविरोध निवडून आला आहे. त्यामुळे ग्रामीण पातळीवर बीआरएसचे आपलं खात उघडलं आहे.

बीआरएस पक्षाच्या सुषमा विष्णू मुळे (Sushma Vishnu Mule) यांची शुक्रवारी सावखेडा ग्रामपंचायतीवर सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.या निवडणुकीमध्ये सुषमा विष्णू मुळे यांचे सर्व सदस्यांच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली.

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, माजी आमदार अण्णासाहेब माने, युवा नेते संतोष आण्णासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली सावखेडा ग्रामपंचायत येथे सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

बहुजन समाजासाठी तेलंगणामध्ये सुरु करण्यात आलेल्या योजना, तेथील सोयीसुविधा याची माहिती चंद्रशेखरराव हे महाराष्ट्रातील सभांमधून देत आहेत. त्यांच्या संघर्षमयी वाटचालीची भुरळ पडून अनेकजण बीआरएस पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना याचा फायदा होऊ शकतो की नाही याची चर्चा सध्या सुरु आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT