Chhatrapati Sambahjinagar : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या २४ एप्रिल रोजी होणाऱ्या जाहीर सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. सोळा अटीसह ही परवानगी दिली असून सभेचे स्थळ देखील बदलण्यात आले आहे. दोन दिवसांपुर्वी (BRS)बीआरएसचे महाराष्ट्र निरिक्षक व स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेवून आमखास मैदानावर जाहीर सभा होणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता ही सभा शहराच्या बाहेर म्हणजेच बीडबायपासजवळ जांबिदा मैदानावर घेण्यात येणार आहे.
बीआरसए पक्षाची महाराष्ट्रातील ही तिसरी सभा आहे. यापुर्वी नांदेड आणि लोहा येथे (K.Chandrashekhar Rao) केसीआर यांची सभा झाली होती. भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर केसीआर यांनी पक्षाच्या विस्ताराची सुरूवात महाराष्ट्रापासून सुरू केली. (Marathwada) तेलंगणाला लागून असलेल्या नांदेडमध्ये केसीआर यांनी पहिली सभा घेतली होती. त्यानंतर लोहा येथे त्यांची दुसरी सभा झाली होती.
आता छत्रपती संभाजीनगर शहरात त्यांची मराठवाड्यातील तिसरी जाहीर सभा होत आहे. (Nanded) काही दिवसांपुर्वी बीआरएचे खासदार बी.बी. पाटील, आमदार आशांगारी जीवन रेड्डी यांच्यासह स्थानिक नेते हर्षवर्धन जाधव, कदीर मौलाना यांनी आमखास मैदान तसेच एमजीएम ग्राऊंडची पाहणी केली होती. पैकी आमखास मैदानावर सभा घेण्याचे निर्धारित करत तशी परवानगी पोलिसांकडे मागतिली होती.
परंतु सध्या रमझान सुरू आहे, शिवाय आमखास मैदानाच्या काही भागात बाजार भरलेला असल्यामुळे सभेचे स्थळ बदलण्याची सूचना पोलिसांनी केली होती. त्यानूसार बीडबायपास येथील जांबिदा मैदानावर सभेला परवानगी मिळावी, यासाठी बीआरएसच्या वतीने अर्ज करण्यात आला होता. या नव्या स्थळी सभा घेण्यास पोलिसांनी १६ अटींसह परवानगी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.